M.B.B.S. विषयी संपूर्ण माहिती - Full information about MBBS Course in Marathi

M.B.B.S. विषयी संपूर्ण माहिती - Full information about MBBS Course in Marathi 

चिकित्सा क्षेत्रात जेव्हा कधी तुम्ही करिअर विषयी विचार करता तेव्हा तुमच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होतात. या सर्व उपलब्ध पर्यायांकडे नजर टाकली असता तर सर्वात जास्त मानला जाणारा आणि सर्वात आवडीचा कोर्स एम.बी.बी.एस. समोर येतो. 

जर तुम्ही देखील या कोर्स साठी प्रवेश घ्यायला इच्छुक असाल आणि मेडिकल क्षेत्रात करिअर बनवू इच्छिता तर या लेखाच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल. 

M.B.B.S. विषयी संपूर्ण माहिती - Full information about MBBS Course in Marathi

इथे
आम्ही तुम्हाला एम.बी.बी.एस. कोर्स (MBBS Course) शी निगडित सर्व गोष्टी सांगणार आहोत, यात जवळपास सर्व महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
मेडिकल मधील प्रमुख कोर्स MBBS विषयी संपूर्ण माहिती - MBBS Course Details in Marathi

एम.बी.बी.एस. चा फुल फॉर्म काय आहे? - MBBS Course Full Form or What is MBBS 

MBBS हा एक बॅचलर किंवा ग्रॅज्युएशन लेव्हल चा कोर्स आहे. याचा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी असा होतो.

एम.बी.बी.एस. चे शिक्षण शुल्क - MBBS Course Fee 

या कोर्सचे एकूण शुल्क हे 3 लाख ते 21 लाख इतके असते, यात आपल्या महाविद्यालयाच्या निवडीनुसार बदल बघायला मिळतात. शासकीय महाविद्यालयात खाजगी महाविद्यालयापेक्षा खूप कमी शुल्क द्यावे लागते

एम.बी.बी.एस. कोर्स चा कालावधी 

या कोर्स च्या कालावधी विषयी चर्चा कराल तर याचा एकूण कालावधी हा 5 वर्ष आणि 6 महिने इतका आहे. यात 4 वर्ष आणि 6 महिने शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर 1 वर्षाची सक्तीची इंटर्नशिप असते. म्हणून कोर्स पूर्ण होण्याचा कालावधी हा कमीत कमी 5 वर्ष आणि 6 महिने इतका असतो.

एम.बी.बी.एस. प्रवेशासाठी मुख्य पात्रता - MBBS Course Eligibility 

खाली या कोर्स साठी लागणाऱ्या पात्रता देत आहोत, त्या वाचून तुम्हाला या कोर्सला प्रवेश घेण्याविषयी सर्व माहिती मिळेल. 

  1. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याने 12 वी पर्यंत शिक्षण हे विज्ञान शाखेतून घेतलेले हवे. यात 12 वि मध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी सोबत इंग्रजी या विषयांसोबत पास होणे अनिवार्य आहे. 

  1. इथे 12वि इयत्तेत असताना कमीत कमी 50% गुण हे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी मधून असणे आवश्यक आहे. 

  1. प्रवेश घेण्यासाठी त्या इच्छूक विद्यार्थ्यांचे वय हे कमीत कमी 17 असावे. 

  1. एम.बी.बी.एस. च्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी प्रवेश पात्रता परीक्षा (NEET- National Eligibility Entrance Test) ही कमीत कमी 40% गुणांनी पास करणे गरजेचे आहे. 

  1. याशिवाय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करून सर्व प्रमुख पात्रता पूर्ण करणे देखील इथे आवश्यक असते. 

एम.बी.बी.एस. कोर्स चा अभ्यासक्रम - MBBS Syllabus 

प्रथम वर्ष - MBBS First Year Syllabus 

सेमिस्टर 1 

विषय- Subject 

  1. सेल बायोलॉजी 

  1. इन्ट्रोडक्शन ऑफ इंब्रायोलॉजी अँड हिस्टोलॉजी 

  1. इन्ट्रोडक्शन टू मोलेक्युलर मेडिसिन 

  1. लोकोमोटर सिस्टम 

  1. फंडामेंटल्स ऑफ डिसीज अँड ट्रीटमेंट 

  1. इन्ट्रोडक्शन टू मेडिकल प्रॅक्टिस 

सेमिस्टर 2 

विषय- Subject 

  1. हेल्थ अँडएनव्हायरमेंट 

  1. हेल्थकेअर कन्सेप्ट 

  1. बेसिक हेमाटोलॉजी 

  1. रेस्पिरेटरी सिस्टम 

  1. न्यूरो सायन्स-1 

दुसरे वर्ष - MBBS Second Year Syllabus 

सेमिस्टर – ३ 

विषय – Subject 

  1. नेओप्लासिया 

  1. इम्यूनिटी 

  1. जनरल पैथोलॉजी 

  1. हेरीडेटरी डिसऑर्डर 

  1. नुट्रिशन डिसऑर्डर 

  1. एनवायरनमेंल पैथोलॉजी 

सेमिस्टर – ४ 

विषय – Subject 

  1. कॉमन सिम्पटम्स एंड साईन्स 

  1. हेमाटोलॉजी 

  1. एलिमेंट्री सिस्टम्स 

  1. सिस्टमिक पैथोलॉजी 

  1. कार्डियोवैस्कुलर सिस्टम 

तृतीय वर्ष – MBBS 3rd Year Syllabus 

सेमिस्टर- ५ 

विषय – Subject

  1. क्लिनिकल पैथोलॉजी 

  1. इम्मुनो पैथोलॉजी 

  1. स्पेशल पैथोलॉजी 

  1. इनफेक्शियस डिसीज 

  1. जनरल पैथोलॉजी 

  1. ग्रोथ डिस्टर्बेंस 

सेमिस्टर – ६ 

विषय – Subject

  1. रिप्रोडक्टिव एंड चाइल्ड हेल्थ 

  1. एपिडेमियोलॉजी ऑफ़ कम्युनिकेबल डिसीज 

  1. एपिडेमियोलॉजी ऑफ़ नॉन कम्युनिकेबल डिसीज 

चौथे वर्ष – MBBS 4th Year Syllabus 

सेमिस्टर – ७ 

विषय – Subject

  1. हेमाटोलॉजी एंड ऑन्कोलॉजी 

  1. न्यूट्रिशनल डिसीज 

  1. डिसीज ऑफ इम्मून सिस्टम, कनेक्टिव्ह टिश्यू एंड जॉइंट्स 

  1. गेरिएट्रिक डिसीज 

  1. इनफेक्शियस डिसीज 

सेमिस्टर – ८ 

विषय – Subject

  1. इमरजेंसी मेडिसीन एंड क्रिटिकल केयर 

  1.  इंडोक्राईन डिसीज 

  1. मेटाबोलिक एंड बोन डिसीज 

  1.  ब्रेन डेथ, ऑर्गन डोनेशन, ऑर्गन प्रीजर्वेशन 

  1. नर्वस सिस्टम 

सेमिस्टर – ९ 

विषय – Subject

  1. इमरजेंसी मेडिसीन एंड क्रिटिकल केयर 

  1. किडनी डिसीज 

  1. एनवायरनमेंल डिसऑर्डर,पॉईजनिंग एंड स्नेक बाईट 

  1. नर्वस सिस्टम

एम.बी.बी.एस प्रवेशासाठी महाविद्यालय/युनिवर्सिटी – MBBS Colleges / Universities 

  • क्रिस्टियन मेडिकल कॉलेज – वेल्लोर 

  • किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी – लखनऊ 

  • गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर (महाराष्ट्र) 

  • गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला (महाराष्ट्र) 

  • युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंस – नई दिल्ली 

  • साविथा मेडिकल कॉलेज चेन्नई 

  • रामैया मेडिकल कॉलेज बैंगलोर 

  • आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे 

  • ग्रांट मेडिकल कॉलेज एंड सर जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई 

  • गवर्नमेंट मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल चंडीगढ 

  • अमृता स्कूल ऑफ मेडिसीन कोची 

  • बी.जे मेडिकल कॉलेज अहमदाबाद 

  • एम्स जोधपुर 

  • डॉ.डी वाय पाटील मेडिकल कॉलेज एंड रिसर्च सेंटर पुणे 

  • गवर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर 

  • गवर्नमेंट मेडिकल कॉलेज अमृतसर 

  • एस.एम.एस मेडिकल कॉलेज जयपूर 

  • के.पी.सी मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल कोलकता 

  • सेंट जॉन मेडिकल कॉलेज बैंगलोर 

  • एस व्ही एस मेडिकल कॉलेज तेलंगाना 

  • इंडेक्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर इंदौर 

  • आसाम मेडिकल कॉलेज दिब्रुगढ 

  • दरभंगा मेडिकल कॉलेज बिहार 

  • बाबा राघव दास मेडिकल कॉलेज गोरखपूर 

  • श्री बालाजी विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुद्दुचेरी 

  •  सर्वपल्ली राधाकृष्णन युनिव्हर्सिटी भोपाल

एम.बी.बी.एस. कोर्स विषयी विचारले गेलेले प्रश्न - MBBS Question and Answers 

FAQ

प्रश्न: MBBS कोर्स चा एकूण कालावधी किती असतो? (MBBS Course Duration) 

उत्तर: पाच वर्षे सहा महिने 

प्रश्न: MBBS प्रवेशासाठी कोणती प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागते? ( MBBS Entrance Exam) 

उत्तर: नीट (NEET- National Eligibility Entrance Test) 

प्रश्न: MBBS ला प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता कोणती? (MBBS Educational Eligibility) 

उत्तर: इयत्ता बारावी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी या विषयांसोबत 50% कमीत कमी गुण असून पास होणे. 

प्रश्न: MBBS कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप पूर्ण करणे बंधनकारक आहे का? (Internship after MBBS) 

उत्तर: हो 

प्रश्न: MBBS कोर्स पूर्ण केल्यानंतर सरकारी क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत का? (Jobs after MBBS in Government Sector) 

उत्तर: हो 

प्रश्न: एम.बी.बी.एस. कोर्स नंतर पगार किती मिळतो? ( Salary After MBBS) 

उत्तर: सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या अनुसार त्या MBBS पूर्ण झालेल्या व्यक्तीला सॅलरी दिली जाते. ही 50 हजार पासून पुढे असते.  

प्रश्न: MBBS शिक्षण घेताना कोणती पुस्तके वापरावी, सल्ला घ्या? (Books for MBBS Preparation) 

उत्तर: हँडबुक ऑफ जनरल एनाटॉमी - बी डी चौरासिया, गैगोंग रिव्ह्यू ऑफ मेडिकल फिजिओलॉजी - विलियम फ्रान्सिस गैगोंग, टेक्स्टबुक ऑफ पॅथॉलॉजी- हर्ष मोहन, एटलास ऑफ ह्युमन एनाटॉमी - फ्रांक नेटर 

प्रश्न: नीट (NEET- National Eligibility Entrance Test) च्या तयारीसाठी काही पुस्तके सुचवा?  (Books for NEET Entrance Exam) 

उत्तर: फंडामेंटल फिजिक्स - प्रदीप, कन्सेप्ट ऑफ फिजिक्स- एच सी वर्मा, दिनेश केमिस्ट्री गाईड, फिजिकल केमिस्ट्री - ओ पी टंडन, ऑब्जेक्टिव्ह बायोलॉजी - दिनेश, प्रदीप गाईड ऑन बायोलॉजी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने