स्टोरेज डिव्हाईस चे प्रकार - Types of storage devices in Marathi
खूप वेळा हा प्रश्न तुम्ही कोणत्या न कोणत्या तरी competitive exam मध्ये नक्की बघितला असेल की कॉम्पुटर म्हणजेच संगणकाचे स्टोरेज डिव्हाईस हे कोणत्या प्रकारचे किंवा टाईपचे असतात? आणि ते कोणते? जर तुम्हाला ही या विषयावर संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला हे Computer Storage Devices Types in Marathi हे आर्टिकल पूर्ण वाचायलाच हवे.
तर कोणतीही वेळ वाया न घालवता सर्व कॉम्पुटर Storage Devices च्या प्रकारा विषयी जाणून घेऊयात.
बघायला गेलं तर Computer storage devices चे खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात परंतु आज आपण त्यांना अशा प्रकारांमध्ये विभागणार आहोत की जेणेकरून ते समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी सोप्पे होईल.
त्यासाठी आपण या स्टोरेज डिव्हाईस ला 5 गटांमध्ये विभागणी करतो आहे. ज्यांच्या विषयी तुम्हाला पुढे माहिती मिळेल. तुमच्या माहिती साठी सांगतो की या स्टोरेज डिव्हाईस चा वापर कॉम्प्युटर मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी होतो.
मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाईस -Magnetic Storage Device
सर्वात आधी जे स्टोरेज डिव्हाईस येतात त्यात असतात Magnetic Storage Device. या डिव्हाइसेस चा आजच्या काळात खूप जास्त उपयोग हा केला जातो आहे. याचे कारण म्हणजे हे स्वस्त असतात आणि सहजरित्या यांना access करता येते. याशिवाय यात खूप जास्त प्रमाणात data सेव्ह देखील करता येतो.
जेव्हा हे magnetic storage devices संगणकाशी जोडले जातात तेव्हा दोन magnetic polarities च्या साहाय्याने एक magnetic field निर्माण होते. हे डिव्हाईस सहज binary language वाचू शकतात आणि सोबतच information store देखील करू शकतात.
मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाईस चे उदाहरण
चला आता काही मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाईसच्या उदाहरनां विषयी जाणून घेऊयात.
Floppy Disk- यांना floppy diskette देखील बोलवले जाते. हे एक removable storage device असते. म्हणजेच याला सहज काढले आणि जोडले जाऊ शकते. याचा आकार एका चौरसा सारखा असतो आणि त्यात काही magnetic elements देखील असतात.
याला जेव्हा कॉम्पुटर च्या disk reader मध्ये जोडले जाते तेव्हा हे फिरते आणि यात data store केला जातो. यांना आता उपयोगात आणले जात नाही कारण यांची जागा आता CDs, DVDs आणि USB Drives ने घेतली आहे.
Hard Drive- Hard Drive हा एक असा primary storage device आहे जो डायरेक्ट motherboard च्या disk controller सोबत जोडलेला असतो. ही एक खुप महत्वाची storage space आहे. कारण याचाच वापर कोणताही नवीन program किंवा application या कॉम्प्युटर मध्ये install करण्यासाठी केला जातो.
मग ते कोणते software programs, images, videos किंवा दुसरे काही असो. खूप मोठ्या प्रमाणात data हा hard drive मध्येच स्टोअर करता येत असतो.
Zip Disk- Zip Disk ही एक अशी removable storage device आहे जी Iomega द्वारे सुरू केले होते. सुरुवातीच्या काळात यात फक्त 100MB data स्टोअर करता येत असे. पुढील काळात यात तुम्ही 750MB पर्यंत डेटा स्टोअर करू शकत होता.
Magnetic Strip- या magnetic strips त्या डिव्हाईस सोबत जोडलेल्या असतात जिथे digital data असतो. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे तुमचे ATM Debit Cards, ज्यांच्या पाठीमागे जी काळी strip असते ती digital data स्टोअर करण्याचे काम करते.
ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाईस- Optical Storage Devices
Optical Storage Devices त्या डिव्हाइसेस ला संबोधले जाते जे lasers आणि lights वापरून data स्टोअर आणि detect करत असतात. हे USB Drives च्या तुलनेत खुप स्वस्त असतात आणि त्यांच्या तुलनेत जास्त data स्टोअर करण्याची क्षमता देखिल ठेवतात.
ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाईस चे उदाहरण
चला आता optical storage devices चे काही उदाहरण जाणून घेऊयात.
CD-ROM - CD चा फुल फॉर्म हा Compact Disc असा होतो. हे एक Read Only Memory device असून external device असते. जे डेटा read आणि audio किंवा software data च्या रुपात स्टोअर करू शकते. एक CD-ROM जवळपास 650MB किंवा 700MB इतका डेटा स्टोअर करू शकते.
Blu-Ray Disc- Blu-Ray disc किंवा ज्याला फक्त Blu-ray या नावाने ओळखतात. हा एक digital optical disc storage format असतो. ही खरी तर DVD format ला supersede म्हणजेच त्याच्यापेक्षा जास्त उत्तम बनण्यासाठी डिझाईन केले गेले होते. ही कित्येक तास High-definition video स्टोअर करण्याची क्षमता ठेवतात.
DVD- DVD चा फुल फॉर्म होतो Digital Versatile Disc. ही एक वेगळ्या प्रकारची Optical storage disk आहे.
ही तुम्ही readable, recordable आणि rewritable म्हणून वापरू शकता. या डिव्हाईस मध्ये रेकॉर्डिंग करून ती बाहेर दुसऱ्या सिस्टम सोबत जोडून वापरात आणता येते.
CD-R - CD-R एक Readable Compact Disc असते. यात Photosensitive organic dye चा वापर हा डेटा record आणि store करण्यासाठी केला जातो. याला तुम्ही software आणि applications स्टोअर करण्यासाठी एक low-cost replacement म्हणू शकता.
DVD-R, DVD+R, DVD-RW आणि DVD+RW Disc - DVD-R आणि DVD+R या Recordable discs असतात ज्यामध्ये केवळ एकच वेळा लिहिले जाऊ शकते. तर DVD-RW आणि DVD+RW यांना rewritable disc देखील म्हणले जाते म्हणजेच यावर एकापेक्षा जास्त वेळा लिहिले जाऊ शकते.
- आणि + मध्ये जे प्रमुख फरक असतात त त्याच्या formatting आणि compatibility शी निगडित असतात.
फ्लॅश मेमरी स्टोरेज डिव्हाईस - Flash Memory Storage Devices
Flash Memory Storage Devices ने सध्याच्या घडीला दोन्ही magnetic आणि optical storage devices ची जागा घेतली आहे. हे वापर करण्यासाठी खूप सोप्पे असतात. त्यासोबत हे खूप portable असतात त्यामुळे यांना कधीही आणि कुठेही उपलब्ध करून उपयोगात आणता येते.
हे डेटा स्टोअर करण्यासाठी खूप जास्त स्वस्त आणि जास्त सुविधा दायक असतात.
फ्लॅश मेमरी स्टोरेज डिव्हाईस चे उदाहरण
चला तर आता जाणून घेऊयात Flash memory storage devices च्या उदाहरणाविषयी जे सध्या लोक खूप जास्त प्रमाणात वापरात आणतात.
USB Drive - USB Drive ला आपण pen drive म्हणत असतो. हे स्टोरेज डिव्हाईस आकाराच्या बाबतीत खूप छोटे असतात परंतु प्रचंड डेटा स्टोअर करण्यासाठी त्यांची क्षमता असते.
यात एक internal circuit असते जे आपल्याला allow करते डेटा store करण्यासाठी आणि replace करण्यासाठी.
Memory Card- या मेमरी कार्ड चा उपयोग हा छोटे electronic आणि computerised devices जसे की mobile phones आणि digital camera मध्ये होतो. या मेमरी कार्ड चा वापर हा images, videos आणि audios स्टोअर करण्यासाठी केला जातो. हे खूप जास्त Compatible असतात आणि आकाराने देखील खूप छोटे असतात.
Memory Stick- या memory sticks originally sony कंपनी कडून लाँच करण्यात आल्या होत्या. मेमरी स्टिक्स या जास्त डेटा स्टोअर करू शकत होत्या आणि या स्टोरेज डिव्हाईस चा वापर करून डेटा ट्रान्सफर हे सोप्पे आणि फास्ट होते.
वेळेनुसार मेमरी स्टिक्स चे वेगवेगळे व्हर्जन देखील तयार व्हायला लागले.
SD Card- SD Card चा फुल फॉर्म होतो Secure Digital Card. या कार्ड्स चा वापर वेगवेगळ्या electronic devices मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो. SD card हे mini आणि micro साईझ मध्ये उपलब्ध असतात.
साधारणतः बघितले तर नवीन कॉम्पुटर मध्ये SD CARD वापरण्यासाठी एक वेगळा Slot दिलेला असतो. जर एखाद्या डिव्हाईसला तो slot नसेल तर काही USB Reader चा वापर करून आपण त्यात SD कार्ड टाकून ते वापरू शकतो.
SSD- SSD चा फुल फॉर्म होतो Solid State Drive. हे एक फ्लॅश मेमरी डिव्हाईस आहे जे integrated circuit assemblies चा वापर डेटा सेव्ह करण्यासाठी करते.
ऑनलाइन आणि क्लाउड स्टोरेज डिव्हाईस - Online and Cloud Storage Device
सध्याच्या काळात Cloud Storage Devices ची पसंती खूप जास्त आहे. आज सर्वांना घरी बसूनच सर्व काही हवे आहे. अशात online आणि cloud storage devices असे करण्यासाठी पूर्णपणे सक्षम दिसून येतात. कारण यांना कोणीही कुठेही access करू शकते.
क्लाउड स्टोरेज डिव्हाईस चे उदाहरण
चला तर मग आता Cloud Storage Devices चे उदाहरण जाणून घेऊयात.
Cloud Storage- यात डेटा हा remotely manage केला जातो आणि हा आपल्याला network च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. याचे काही basic features ला तुम्ही मोफत वापरू शकता परंतु जर तुम्हाला जास्त स्टोरेज हवे असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील मोजावे लागतील.
Network Media- Audio, Video, Images किंवा text या सर्व गोष्टी कॉम्पुटर नेटवर्क मध्ये वापरल्या जातात. यात लोकांचा एक समूह काही कंटेंट हे ऑनलाइन बनवतात आणि ते दुसऱ्यासोबत share देखील करतात.
पेपर स्टोरेज डिव्हाईस - Paper Storage Devices
या paper storage device चा वापर जुन्या काळात information save करण्यासाठी होत होता.
पेपर स्टोरेज डिव्हाईस चे उदाहरण
चला जाणून घेऊयात Paper storage Device ची काही उदाहरणे.
OMR- OMR चा फुल फॉर्म होतो Optical Mark Recognition. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात मनुष्याद्वारे केलेल्या marked data ला capture केले जाते. उदाहरण म्हणजे surveys आणि tests. तर याचा वापर सध्या exam क्षेत्रात होतो आहे.
Punch Card- हा एक सख्त पेपरचा भाग असतो ज्याचा वापर हा digital information स्टोअर करण्यासाठी केला जातो. जे त्या perforated holes मधून येत असतात. अगोदरच निर्धारित केलेल्या पदांवर छिद्रांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती डेटा विषयी माहिती देते.
Frequently Asked Question (FAQ)
स्टोरेज डिव्हाईस चे महत्व?
स्टोरेज डिव्हाईस चे महत्व हे आहे की यात डेटा स्टोअर केला जाऊ शकतो. त्या डेटा ला सुरक्षित ठेवले जाऊ शकते आणि गरज भासल्यावर त्याचा वापर देखील केला जाऊ शकतो.
स्टोरेजची व्याख्या काय आहे?
स्टोरेज ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे डिजिटल डेटा हा एका डेटा स्टोरेज डिव्हाईस च्या आतमध्ये सुरक्षित ठेवला जातो. हे करण्यासाठी computing technology चा वापर केला जातो. किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की स्टोरेज एक असे mechanism आहे जे कॉम्प्यूटर ला स्थायी किंवा अस्थायी रुपात डेटा सांभाळण्यासाठी सक्षम बनवतात.
सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस म्हणजे काय?
सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस हे असे स्टोरेज डिव्हाईस आहे जे अशा non volatile storage device ला रेफर करते जे कॉम्प्युटर साठी internal किंवा external असू शकते. Primary Data Storage devices सोडता हे कोणतेही storage device असू शकते जे डेटा स्थायी रुपात सेव्ह करत असतात. उदाहरण म्हणजे external hard drives, USB flash Drives, Tape Drives हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस म्हणवले जातात.
स्टोरेजचा अर्थ काय होतो?
स्टोरेज किंवा कॉम्प्युटर स्टोरेज ही अशी टेक्निक असते ज्यामध्ये कॉम्पुटर च्या उपकरणाचा आणि रेकॉर्डिंग मीडिया चा वापर हा डिजिटल डेटा बनवून ठेवण्यासाठी केला जातो. हे कॉम्प्युटर चे एक Core function देखील असते.
प्रायमरी मेमरी डिव्हाईस म्हणजे काय?
प्रायमरी मेमरी डिव्हाईस किंवा स्टोरेज डिव्हाईस एक असे माध्यम आहे जे मेमरी कमी कालावधी साठी साठवून ठेवते ते देखील जेव्हा संगणक सुरू असेल तेव्हाच! भलेही प्रायमरी मेमरी डिव्हाईस चा access time हा कमी आणि faster performance असला तरी देखील ते सेकंडरी स्टोरेज डिव्हाईस पेक्षा महाग असतात. उदाहरण म्हणजे RAM (Random Access Memory) आणि Cache हे दोन्ही प्रायमरी मेमरी डिव्हाईस किंवा प्रायमरी स्टोरेज डिव्हाईस म्हणून ओळखले जातात.
आज आपण काय शिकलात?
आम्हाला आशा आहे की आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल आणि समजले देखील असेल की स्टोरेज डिव्हाईस चे प्रकार काय असतात. आपण Computer storage devices चे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची उदाहरणे देखील बघितली.
या लेखाशी निगडित काही प्रश्न, शंका आणि मते असतील तर ती खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. तुमची मदत करण्यासाठी आम्हाला नक्की आनंद होईल.