ऑक्सिजन सिलेंडर प्लांट : महामारीत एक नवीन उद्योगाची सुवर्णसंधी - How To Start Oxygen Plant

ऑक्सिजन सिलेंडर प्लांट : महामारीत एक नवीन उद्योगाची सुवर्णसंधी - How To Start Oxygen Plant  

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर प्लांट (बिजनेस), कसा स्थापन करणार, क्षमता, किंमत, रेट, डीलरशीप, गुंतवणूक ( How to Start Oxygen Cylinder Business, Plant, Plan, Capacity, Licence, Manufacturer, Cost, Investment, India, Profit in Marathi)

आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याच्या काळातच नाही परंतु आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते. ऑक्सिजन ला जीवन देणारा म्हणजेच प्राणवायू म्हणले जाते. ऑक्सिजन शिवाय जीवन जगणे शक्य नाहीये. आपण ज्या वातावरणात जगतो आहे तिथे ऑक्सिजन शिवाय नायट्रोजन, कार्बन डायॉक्साईड सारखे गॅस देखील आहेत. त्यात सर्वात जास्त ऑक्सिजन असते, जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे. आज या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज त्या रुग्णांना आहे जे या महामारीने ग्रस्त आहेत. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक दिवशी ऑक्सिजनची कमतरता भासते आहे आणि याची मागणी खूप जास्त वाढते आहे. अशा संकट काळात जर तुम्ही ऑक्सिजन प्लांट सुरू करणार असाल तर याने तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो, फायद्याचं सोडा परंतु त्या रुग्णांची सेवा करण्याची आणि त्यांचे जीवन वाचवायची संधी तुम्हाला मिळू शकते. 

ऑक्सिजन सिलेंडर प्लांट : महामारीत एक नवीन उद्योगाची सुवर्णसंधी - How To Start Oxygen Plant

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर चा बिजनेस कसा सुरू करायचा? (How to Start) 

ऑक्सिजन सिलेंडर मध्ये जी गॅस भरलेली असते ती पूर्णपणे शुद्ध असते. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन मध्ये 85 टक्क्यांहून अधिक आणि कमीत कमी अशुद्धी मध्ये असते. यातून या ऑक्सिजन ची शुद्धता कळते. जर आपण ऑक्सिजन सिलेंडर चा व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. 

ऑक्सिजन प्लांट सुरू करताना एकदा नक्की खात्री करून घ्या की तुम्ही वापरणार असलेले पदार्थ आणि रसायन हे शुद्ध असले पाहिजे, यात कोणत्याही प्रकारची आरोग्याला घातक अशी भेसळ नसावी. या काळात कमीत कमी या जीवनावश्यक वस्तूत आपण भेसळ करू नये, हीच विनंती. आपल्याला ऑक्सिजन सप्लाय आणि सिलेंडर हँडलिंग च्या सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागणार आहे. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस चे प्रकार 

ऑक्सिजन सिलेंडरच्या व्यवसायात आपण 2 प्रकारे व्यवसाय करू शकता, पहिला म्हणजे स्वतःचा ऑक्सिजन सिलेंडर चा प्लांट सुरू करणे किंवा एखाद्या प्लांट सोबत जोडले जाऊन affiliate व्यवसाय करणे. या दोन्ही मधून देखील आपण चांगला प्रॉफिट कमावू शकता. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस मार्केट रिसर्च 

म्हणतात की गरज हीच शोधाची जननी आहे. सध्याच्या काळात कोरोना महामारी विक्राळ रूप धारण करते आहे आणि हॉस्पिटल्स मध्ये रुग्णांना ऑक्सिजनची खूप जास्त गरज भासते आहे. अशात जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरचा व्यवसाय सुरू कराल तर यात तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकेल. जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडरचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले आहे तर यात जास्त उशीर करायला नको. कारण आजच्या काळात ऑक्सिजन सिलेंडरची मागणी खूप जास्त आहे. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस मॅन्युफॅक्चरिंग युनिट 

ऑक्सिजनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक ही करायची नाहीये, अशात तुम्ही कोणत्याही एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला कॉन्टॅक्ट करू शकता. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स हे ऑक्सिजन बनवण्यापासून तर सिलेंडर भरण्यापर्यंत काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिट सोबत जोडले जाऊन आपण त्यांच्याकडून सर्व काही माहिती घेऊ शकतो. आणि सर्व माहिती मिळाली की सिलेंडरचा बिजनेस सुरू करू शकतो. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस मशीन आणि साहित्य 

ऑक्सिजन सिलेंडर निर्मिती व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपल्याला या बिजनेसच्या लॉजिस्टिक्स ला समजून घ्यायचे आहे. ऑक्सिजन सिलेंडर व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काही मशीन आणि साहित्याची गरज असते. बाजारात अगोदरच ऑक्सिजनचे कन्स्ट्रेंट उपलब्ध आहे परंतु ते सोडता इतर बरंच काही आपल्याला गरजेचे आहे 

  • प्रवाह मोजण्याचे यंत्र 

  • प्रेशर गेज 

  • ऑक्सिजन मास्क 

या शिवाय अन्य काही एलिमेंट असतात जे पूर्ण सिस्टम ला एक सोबत जोडतात. या गोष्टींची माहिती आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग युनिट वर गेल्यावर जास्त समजू शकते. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर साठी सुरक्षा नियम 

मेडिकल क्षेत्रात उपयोगात येणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत सुरक्षितता ही सर्वात अगोदर महत्वाची असते. ऑक्सिजन सिलेंडरचा प्रेशर हा नॉर्मल प्रेशर पेक्षा खूप जास्त असतो. कोणत्याही वयक्तिक वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा प्रेशर हा 3 हजार PSI इतका असतो कधी तो यापेक्षा जास्तही असतो. त्यामुळे हे सिलेंडर बनवताना आणि भरताना खूप जास्त सुरक्षितात आणि काळजी घेण्याची आवश्यकता असते. यासाठी तुम्हाला प्रशासनाने बनवून दिलेले काही प्रोटोकॉल देखील फॉलो करावे लागतात. 

ऑक्सिजन सिलेंडर परिवहन करताना मुख्य रुपात आपल्याला व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्य प्रशासनपरिवहन नियमांचे काही नियम आहेत त्यांचे पालन करावे लागते. मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बनवत असताना आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियम पाळले आहेत याची खात्री द्यावी लागते. ऑक्सिजन सिलेंडर भरताना आणि साठवणूक करताना देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस लोकेशन 

आजकाल आपण वृत्तपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून बघतो आहे की हॉस्पिटल्स ला ऑक्सिजनची जास्त गरज असते. अशात जर तुम्ही हॉस्पिटल जवळ एखाद्या ठिकाणी हा प्लांट सुरू कराल तर परिवहन खर्च कमी होईलजास्त फायदा होईल. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस साठी लायसन्स (License) 

मेडिकल क्षेत्राशी निगडित कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या आधी आपल्याला त्या संबंधित लायसन्स म्हणजे परवाना घेणे गरजेचे असते. काही राज्यामध्ये आपल्याला या संबंधी व्यवसाय सुरू करताना आवश्यक असणारे क्वालिफिकेशन देखील लागते. हे लायसन्स आपल्याला आपल्या राज्य स्तरावर मिळेल. काही राज्यांमध्ये आपल्याला तेथील स्थानिक प्रशासनाकडून देखील लायसन्स मिळू शकेल. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस साठी स्टाफ 

आपल्या व्यवसायासाठी किती स्टाफ ची गरज आहे हे आपल्या व्यवसायाच्या स्तरावर अवलंबून आहे. जर व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू असेल तर 4 ते 5 कामगार लागतात. त्यानुसार जर आपल्या व्यवसायाचा स्तर हा उंच असेल तर आपल्याला जास्त स्टाफची गरज असेल. 

मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडर बिजनेस गुंतवणूक (Cost in India) 

कोणत्याही व्यवसायाला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला हे जाणून घेणे गरजेचे असते की आपल्याला त्यात किती पैसे गुंतवावे लागणार आहेत. ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस मध्ये आपल्याला जवळपास 10 ते 15 लाख रुपये गुंतवणूक करावे लागणार आहेत. हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्यामुळे बँक देखील सध्या आपल्याला सहज लोन देते आहे. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस फायदा (Profit)  

सध्याच्या काळात देशात कोरोना चा कहर सुरू आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत लोकांना खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते आहे. अशात तुम्ही जर ऑक्सिजन सिलेंडर चा व्यवसाय सुरू केला तर आपल्याला खूप जास्त प्रॉफिट, फायदा होऊ शकतो. यात फायदा कमी झाला तरी लोकांना आपल्या कार्याचा फायदा होतोय याचा आनंद वेगळाच असेल. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस मार्केटिंग 

देशात सध्याच्या काळात ऑक्सिजनची गरज बघता संपूर्ण भारतातून तुम्हाला एकदा जर नाव पोहोचले तरी ऑर्डर्स यायला लागतील. प्रसार करण्यासाठी सध्या तरी तुम्हाला कोणत्याही मोठ्या कष्टांची गरज नसावी. 

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस जोखीम 

ऑक्सिजन सिलेंडर मध्ये दबाव हा खूप जास्त असतो त्यामुळे याची प्रवासात आणि जागेवरून हलवताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते. हेच कारण आहे त्यामुळे प्रवासात या व्यवसायात जोखीम मोठी आहे. हा व्यवसाय करत असताना आपल्याला सर्व प्रोटोकॉल हे फॉलो करावे लागतात. कोरोना काळात हा व्यवसाय आपल्याला खूप जास्त फायदा देऊन जाईल परंतु यात फक्त फायदाबघता आपण लोकांचे हित बघितले तर भविष्यात देखील व्यवसाय उंचीच गाठत राहील. 


या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर बिजनेस विषयी माहिती दिलेली आहे. कोरोनाकाळात आपण या पद्धतीने प्लांट सुरू करू शकता 


FAQ 

प्रश्न : ऑक्सिजन सिलेंडर व्यवसायात गुंतवणूक किती करावी लागेल? 

उत्तर : या व्यवसायात आपल्याला 10 ते 15 लाख गुंतवणूक करावी लागेल, छोट्या स्तरावर आपण 2 लाख पासून काम सुरू करू शकता. 

प्रश्न : ऑक्सिजन सिलेंडर प्लांट कुठे सुरू करावा? 

उत्तर : ऑक्सिजन सिलेंडर प्लांट हॉस्पिटल्स क्षेत्रात सुरू करावा. 

प्रश्न : ऑक्सिजन सिलेंडर व्यवसाय हा लीगल आहे का? 

उत्तर : आपल्याकडे परवाना असेल तर लीगल आहे. 

प्रश्न : एका ऑक्सिजन सिलेंडरचे मूल्य किती आहे? 

उत्तर : 10 लिटर ऑक्सिजन सिलेंडरची किंमत ही 10 हजार ते 25 हजार इतके असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने