स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी चरित्र - Swami Vivekananda Biography in Marathi
एका युवा संन्याशाच्या रुपात भारतीय संस्कृतीचे वारे परदेशात पसरवणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे गाढे पंडित होते. स्वामी विवेकानंद - Swami Vivekananda यांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग या ग्रंथांची रचना करत युवा पिढीला एक नवीन मार्ग दाखविला. यांचा प्रभाव जनमानसात कित्येक युगा पर्यंत राहील. कन्याकुमारी येथे निर्मित असलेला त्यांचे स्मारक आजही स्वामी विवेकानंद यांच्या महानतेची गाथा सांगतात.
"संभव की सीमा जानने का केवल एक ही तरीका है असंभव से भी आगे निकल जाना।"
अशा विचारांचे व्यक्तित्व होते स्वामी विवेकानंद- swami Vivekananda. ज्यांनी अध्यात्मिक आणि धार्मिक ज्ञानाच्या जोरावर सर्व मानव जातीला आपल्या रचनाच्या माध्यमातून शिकवण दिली की ते कायम कामावर भरवसा ठेवणारे महापुरुष होते. Swami Vivekananda - स्वामी विवेकानंद यांचे म्हणणे होते की आपल्या ध्येयाला गाठण्यासाठी तोपर्यंत प्रयत्न केले पाहिजे जोपर्यंत आपले ते ध्येय प्राप्त होत नाही.
तेजस्वी प्रभाव असणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांचे विचार हे खूप प्रभावित करणारे आहेत. या विचारांची अंमलबजावणी जर कोणी स्वतःच्या आयुष्यात करेल तर यश हे नक्कीच प्राप्त होईल. इतकेच नाही तर विवेकानंद यांनी आपल्या अध्यात्मातून प्राप्त विचारांना वापरून लोकांना प्रेरित केले, यातील एक विचार असा होता-
"उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका."
स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या अध्यात्मिक चिंतन आणि तत्वज्ञानातून फक्त लोकांना प्रेरणा दिली असे नाही तर त्यांनी भारताला संपूर्ण जगात मानाचे स्थान मिळवून दिले.
स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी चरित्र - Swami Vivekananda Biography in Marathi
स्वामी विवेकानंद यांच्या विषयी - swami vivekananda information in marathi
पूर्ण नाव (Full Name) : नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म (Birthday) : 12 जानेवारी 1863
जन्मस्थळ (Birthplace) : कोलकत्ता (पश्चिम बंगाल)
वडील (Father) : विश्वनाथ दत्त
आई (Mother) : भुवनेश्वरी देवी
टोपण नाव (Nickname) : नरेंद्र किंवा नरेन
मठात आल्यानंतर नाव : स्वामी विवेकानंद
भावंडे : 9
गुरुचे नाव : रामकृष्ण परमहंस
शिक्षण (Education) : 1884 मध्ये बी ए परीक्षा उत्तीर्ण
विवाह (Wife name) : लग्न केले नाही
संस्थापक : रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन
तत्वज्ञान : आधुनिक वेदांत, राज योग
साहित्य : राजयोग, कर्मयोग, भक्तियोग, मेरे गुरू, अल्मोडा ते कोलंबो दिलेले व्याख्यान
इतर महत्वाची कामे :
न्यूयॉर्क मध्ये वेदांत सिटी ची स्थापना
कॅलिफोर्निया मध्ये शांती आश्रम आणि भारतात अल्मोडा जवळ अद्धैत आश्रमाची स्थापना केली.
प्रसिद्ध विचार : "उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका."
मृत्यू (Death) : 4 जुलै 1902
मृत्यू ठिकाण : बेलूर, पश्चिम बंगाल, भारत
स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय - Swami Vivekananda History in Marathi
स्वामी विवेकानंद एक असे महापुरुष होते ज्यांच्या उच्च विचाराने, अध्यात्मिक ज्ञान, सांस्कृतिक अनुभव याने सर्व प्रभावित होते. त्यांनी प्रत्येकावर आपली एक अदभुत छाप सोडली होती. स्वामी विवेकानंद यांचे जीवन हे काही लोकांना जीवनात नवीन ऊर्जा टाकतात आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद एक प्रतिभाशाली महापुरुष होते, ज्यांना वेदांचे पूर्ण ज्ञान होते. विवेकानंद हे दुरदर्शी विचार ठेवणारे व्यक्ती होते, त्यांनी फक्त भारताच्या विकासासाठी काम केले नाही तर त्यांनी लोकांना जीवनात जगण्याची कला देखील शिकवली.
स्वामी विवेकानंद भारतात हिंदू धर्म वाढवण्यासाठी त्यांची भूमिका ही मुख्य होती. भारतात गुंतवणूकदारांचे मुख्य लक्ष बनवण्याचे काम देखील स्वामी विवेकानंद यांनी केले.
स्वामी विवेकानंद हे दयाळू स्वभावाचे व्यक्ती होते जे फक्त मनुष्याला नव्हे तर प्राणी मात्रांवर देखील दया दाखवत होते. ते कायम बंधू भाव, प्रेम यांचे शिक्षण देत होते. त्यांचे म्हणणे होते की प्रेम, बंधुभाव आणि सदभावना यांच्या सोबत जीवन हे निघून जाते आणि जीवनातील प्रत्येक संघर्षाला आपण सहज तोंड देऊ शकतो. ते स्वतःवर अभिमान असलेले व्यक्ती होते, त्यांचा एक विचार होता की-
"जब तक आप स्वयं पर विश्वास नहीं करते, आप भगवान पर विश्वास नही कर सकते।"
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी त्यांना महान पुरुष बनवले होते. अध्यात्मिक ज्ञान, धर्म, ऊर्जा, समाज, संस्कृती, देश, परोपकार, सदाचार, आत्म सन्मान यांचा योग्य दृष्टीने ते वापर करत असत. असे खूप कमी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात की एखादा व्यक्ती इतक्या सगळ्या गुणांनी भरलेला असतो आणि तो भारतात जन्म घेऊन भारताला गौरवास्पद वाटेल असे कार्य करतो.
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली, या दोन्ही गोष्टी आजही भारतात यशस्वी पणे सुरू आहेत. त्यांना प्रमुख रूपाने शिकागो येथील विश्व धर्म संमेलनात हिंदू धर्माची ओळख करून देताना भाषणाची सुरुवात ही "मेरे अमेरिकी भाइयो और बहनो" करण्यासाठी ओळखले जाते.
स्वामी विवेकानंद यांचे सुरुवातीचे जीवन - Life History of Swami Vivekananda - Full Detailed History
Swami Vivekananda Date of Birth- महापुरुष स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. विलक्षण प्रतिभाशैली असणाऱ्या या युगपुरुषाने कोलकत्ता मध्ये जन्म घेत त्या भूमीला पवित्र केले. त्यांचे खरे नाव हे नरेंद्रनाथ दत्त होते परंतु लहानपणी त्यांना सर्व नरेंद्र या नावाने ओळखत.
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव हे विश्वनाथ दत्त होते व ते त्या काळात कोलकत्ता हायकोर्ट मध्ये एक प्रतिष्ठित आणि यशस्वी वकील होते. त्यांच्या वकिलीची चांगलीच चर्चा होत असे. त्यांना इंग्रजी आणि फारशी या भाषांवर देखील चांगली पकड होती.
विवेकानंद यांच्या आईचे नाव हे भुवनेश्वरी देवी होते. या धार्मिक विचारांच्या महिला होत्या आणि त्यांचे व्यक्तित्व देखील खूप प्रभावशाली होते.त्यांनी रामायण महाभारत सारख्या धार्मिक ग्रंथांचे चांगल्याप्रकारे ज्ञान प्राप्त केलेले होते. त्या बुद्धिमान महिला होत्या आणि त्यांना इंग्रजी भाषेचे देखील ज्ञान होते.
त्यांच्या आईचा विवेकानंद यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते घरातच ध्यानस्थ होत असे. त्यांच्या आईकडून देखील त्यांना शिक्षा मिळाली होती. त्यासोबत विवेकानंद यांच्यावर त्यांच्या आई वडिलांच्या गुणांचा चांगलाच प्रभाव पडलेला होता. त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा त्यांच्या घरूनच मिळाली.
स्वामी विवेकानंद यांच्या आई वडिलांचे चांगले संस्कार व त्यांची केलेली देखभाल यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाला एक चांगला आकार आणि असे उच्च विचार मिळाले.
म्हणले जाते की नरेंद्र नाथ हे लहानपणा पासून खोडकर आणि खूप तल्लख बुद्धीचे व्यक्ती होते. त्यांची स्मरणशक्ती इतकी तेज होती की एकदा त्यांच्या समोरून गेलेली गोष्ट ते कधीच विसरत नव्हते. त्यांनी ती गोष्ट पुन्हा वाचायची गरज देखील भासत नसे.
त्यांची आई कायम म्हणायची की, " मी महादेवाला प्रार्थना करून एक पुत्र मागितला होता आणि त्यांनी मला एक शैतान दिला."
तरुणाईतच त्यांना अध्यात्मिक क्षेत्रात आवड निर्माण झाली, ते कायम देवाचे फोटो जसे की राम आणि सीता, महादेव समोर ध्यान लावून साधना करत असत. साधू आणि संन्यासी यांचे विचार त्यांना कायम प्रेरणा देत असत.
पुढे जाऊन नरेंद्र नाथ जगभरात ध्यान, अध्यात्म, राष्ट्रवाद, हिंदू धर्म आणि संस्कृती याचे प्रसारक बनले आणि स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिद्ध झाले.
स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण - Swami Vivekanand Education
1871 मध्ये नरेंद्रनाथ यांचे ऍडमिशन हे ईश्वर चंद विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन संस्थानात झाले.
1877 मध्ये जेव्हा नरेंद्र इयत्ता तिसरीत होते तेव्हा त्यांचे शिक्षण खंडित झाले, त्यांना परिवारासोबत काही कारणास्तव अचानक रायपूरला जावे लागले.
1879 मध्ये ते पुन्हा कोलकत्ता मध्ये आले. प्रेसिडेन्सी कॉलेज च्या एन्ट्रान्स परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवणारे ते पहिले विद्यार्थी बनले.
त्यांना वेगवेगळ्या विषयात जसे की तत्वज्ञान, धर्म, इतिहास, सामान्य विज्ञान, कला आणि साहित्य यात आवड होती. हिंदू धर्मग्रंथांमध्ये देखील त्यांना रुची होती. वेद, उपनिषद, भगवत गीता, रामायण, महाभारत आणि पुराण ते वाचत असे. नरेंद्र हे भारतीय पारंपरिक संगीतात निपुण होते आणि कायम शारीरिक योग, खेळ आणि इतर गोष्टींमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेत असत.
1881 मध्ये त्यांनी ललित कला साठी असणारी परीक्षा उत्तीर्ण केली. 1884 मध्ये त्यांनी कला विषयात ग्रॅज्युएशन ची डिग्री पूर्ण केली होती.
त्यानंतर त्यांनी 1884 मध्ये आपली बी ए ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आणि नंतर वकिलीचे शिक्षण देखील घेतले.
1884 हा काळ स्वामी विवेकानंद यांच्यासाठी दुःखाचा होता कारण त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर त्यांच्या 9 भावंडांची जबाबदारी आली. ते घाबरले नाही, कायम आपल्या दृढनिश्चयावर न डगमगता उभे राहणाऱ्या स्वामीजींनी ही जबाबदारी देखील चांगल्या प्रकारे सांभाळली.
1889 मध्ये नरेंद्र यांचा परिवार पुन्हा कोलकत्ता येथे आला. लहानपणा पासून बुद्धिमान असलेले नरेंद्र यांना पुन्हा एकदा ऍडमिशन मिळाले आणि त्यांनी 3 वर्षांचा कोर्स हा फक्त 1 वर्षात पूर्ण केला.
स्वामी विवेकानंद यांना तत्वज्ञान, धर्म, इतिहास आणि सामान्य विज्ञान या विषयात खूप आवड होती.
नरेंद्र यांनी David hume, Immanuel Kant, Johann Gottlieb Fichte, Baruch Spinoza, George W.F. Hegel, Arthur Schopenhauer, Auguste Comte, John Stuart Mill and Charles Darwin यांच्या कामांचा देखील अभ्यास केला होता.
स्वामी विवेकानंद यांनी जनरल असेंम्बली इस्टिट्युशन मध्ये युरोपियन इतिहासाचा अभ्यास केला.
स्वामी विवेकानंद यांना बंगाली भाषेचे चांगले ज्ञान होते. त्यांनी स्पेन्सर यांचे पुस्तक एज्युकेशन याचा बंगाली अनुवाद केला होता. हर्बट स्पेन्सर यांच्या पुस्तकाने ते खुप प्रभावित होते. जेव्हा ते पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी संस्कृत ग्रंथ आणि बंगाली साहित्याचे देखील वाचन केले.
स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिभेच्या चर्चा या लहानपणा पासूनच होत्या. त्यांना लहानपणापासून शिक्षकांकडून स्तुती मिळाली आहे.
बालक अवस्थेतील नरेंद्र यांच्यावर जॉन स्टुअर्ट, हर्बट स्पेन्सर आणि ह्युमस यांच्या विचारांचा प्रभाव विद्यार्थी जीवनात दिसत होता. त्यांनी हे विचार वाचले होते आणि हेच विचार त्यांनी अमलात आणून पुढे जगाला संबोधित केले. याच काळात विवेकानंद यांच्या जीवनाचा कल हा ब्रह्म समाजाकडे गेला, सत्य जाणून घेण्याची जिज्ञासेने ते ब्रह्म समाजाचे नेते महर्षि देवेंद्र नाथ ठाकूर यांच्या संपर्कात आले.
रामकृष्ण परमहंस यांच्या सोबत स्वामी विवेकानंद यांचे नाते - Ramakrishna Paramahamsa and Swami Vivekananda
स्वामी विवेकानंद हे लहानपणा पासून खूप जिज्ञासू होते. त्यांनी एकदा महर्षी देवेंद्र नाथ यांना प्रश्न केला होता की , तुम्ही कधी देवाला पाहिले आहे का? . नरेंद्र यांच्या या प्रश्नाने महर्षी देखील कोड्यात पडले होते त्यामुळे त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रामकृष्ण परमहंस यांच्या कडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विवेकानंद यांनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
त्या काळात नरेंद्र हे रामकृष्ण परमहंस यांच्याकडे इतके प्रभावित झाले की त्यांच्या मनात आपल्या गुरूच्या विषयी कर्तव्यनिष्ठा आणि श्रद्धा वाढत गेली. 1885 मध्ये रामकृष्ण परमहंस हे कॅन्सर ने ग्रस्त झाले, त्यानंतर विवेकानंद यांनी आपल्या गुरुची खूप सेवा केली. अशा प्रकारे गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते अधिक घट्ट होत गेले.
रामकृष्ण मठाची स्थापना - Establishment of Ramakrishna Math
त्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू झाला. त्यानंतर विवेकानंदांनी वराहनगर येथे रामकृष्ण संघाची स्थापना केली. पुढे जाऊन याचे नाव रामकृष्ण मठ ठेवले गेले. रामकृष्ण मठाची स्थापना केल्यानंतर नरेंद्र नाथ यांनी ब्रह्मचर्य आणि त्यागाचे व्रत घेतले आणि नरेंद्र स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले.
स्वामी विवेकानंद यांचे भारत भ्रमण - Swami Vivekananda Travels in India
मात्र 25 वर्ष वय असताना स्वामी विवेकानंद यांनी भगवे वस्त्र परिधान करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते संपूर्ण भारत वर्षात फिरण्यासाठी पायी यात्रेला निघाले. पायी यात्रे दरम्यान अयोध्या, वाराणसी, आग्रा, वृन्दावन, अलवर सोबत अनेक ठिकाणी ते गेले.
या यात्रेदरम्यान ते राजांच्या महालात देखील थांबले आणि गरिबांच्या झोपडीत देखील त्यांनी विश्रांती घेतली. पायी यात्रेदरम्यान त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांत आणि संबंधित लोकांविषयी माहिती मिळाली. याच दरम्यान त्यांना जातीमधील भेदभाव या विषयी देखील कळले आणि त्यांनी त्याला संपवण्याचा प्रयत्न देखील केला.
23 डिसेंबर 1892 रोजी विवेकानंद हे कन्याकुमारी येथे पोहोचले, इथे ते 3 दिवस गंभीर समाधी मध्ये राहिले. इथून ते माघारी फिरत राजस्थान मधील आबु रोड मध्ये त्यांचे गुरुभाऊ स्वामी ब्रह्मानंद आणि स्वामी सुर्यानंद यांना भेटले.
तिथे त्यांनी त्यांना भारत भ्रमण यात्रेत झालेला त्रास सांगितला आणि ते म्हणाले की त्यांनी या यात्रेत देशातील गरिबी आणि लोकांचे दुःख समजून घेतले आहे आणि हे सर्व बघून ते दुःखी आहेत. त्यानंतर त्यांनी या सर्वांमधून मुक्तता मिळावी म्हणून अमेरिका जाण्याचा निर्णय घेतला.
विवेकानंद यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर त्यांनी जगात भारताच्या विषयी असलेल्या विचारांत खूप बदल केले.
स्वामी विवेकानंद यांची अमेरिका यात्रा व शिकागो येथील भाषण (1893- विश्व धर्म संमेलन) - Swami Vivekananda Chicago Speech
1893 मध्ये विवेकानंद हे शिकागो येथे आले. त्यांनी विश्व धर्म संमेलनात भाग घेतला. या दरम्यान अनेक धर्मगुरूंनी त्यांच्या वेगवेगळ्या ग्रंथांची मांडणी केली तर भारत धर्माच्या वर्णनासाठी श्रीमद भगवत गीता ठेवलेली होती, याची खूप चेष्टा केली गेली. परंतु जेव्हा विवेकानंद यांनी आपल्या अध्यात्म आणि ज्ञानाने भरलेल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा ते सभागृह टाळ्यांच्या गडगडाटाने भरून गेले.
स्वामी विवेकानंद यांच्या भाषणात जिथे वैदिक तत्वज्ञान विषयी माहिती होती तर त्यातुन जगात शांततेने जगण्याचा संदेश लपलेला होता. आपल्या भाषणात स्वामीजींनी कट्टरतावाद आणि सांप्रदायिकतेवर जोरदार हल्ला चढवला होता.
त्यांनी या वेळी भारताची एक वेगळी प्रतिमा बनवली व त्यासोबत ते अधिक लोकप्रिय होत गेले.
स्वामी विवेकानंद यांचे अध्यात्मिक कार्य - Complete Works of Swami Vivekananda
धर्म संसद संपल्यानंतर पुढील 3 वर्ष स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत राहून वेदांचा प्रचार आणि प्रसार केला. अमेरिकेतील वृत्त संस्थांनी स्वामी विवेकानंद यांना " Cyclonic Monik From India" असे नाव दिले होते.
त्यानंतर त्यांनी 2 वर्ष शिकागो, न्यूयॉर्क, डेट्राइट आणि बोस्टन येथे लेक्चर दिले. तर 1894 मध्ये न्यूयॉर्क मध्ये त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली.
1895 मध्ये त्यांच्या सतत व्यस्त राहण्याचा त्यांचा तब्येतीवर असर व्हायला लागला. त्यानंतर त्यांनी लेक्चर देण्या ऐवजी योग विषयी शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांची बहीण निवेदिता त्यांच्या शिष्य बनल्या, या त्यांच्या मुख्य शिष्यांपैकी एक होत्या.
1896 मध्ये ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधील मॅक्स मूलर यांना भेटले. मॅक्स यांनी स्वामींचे गुरू रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र लिहिले होते. त्यानंतर 15 जानेवारी 1897 रोजी स्वामी विवेकानंद हे अमेरिकेहून श्रीलंकेला आले, इथे त्यांचे जोरदार स्वागत केले गेले. तेव्हा ते खूप जास्त प्रसिद्ध झालेले होते आणि लोक त्यांना खूप मानत होते.
त्यानंतर स्वामी विवेकानंद हे रामेश्वरम येथे आले व पुढे कोलकत्ता येथे गेले. त्यांना ऐकण्यासाठी दूर दुरून खुप जास्त प्रमाणात लोक येत असत. आपल्याला सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणामध्ये कायम विकास शब्दाचा वापर केलेला होता.
रामकृष्ण मिशनची स्थापना - Establishment of Ramakrishna Mission
1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंद हे कोलकात्यात परत आले. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश हा होता की नवीन भारताच्या निर्मितीसाठी हॉस्पिटल, शाळा, कॉलेज आणि साफसफाई क्षेत्रात पावले उचलावी.
साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे विद्वान स्वामी विवेकानंद यांनी आपल्या व्यक्तित्वाने सर्वांना घायाळ केले होते, तरुणाईचा ते आदर्श बनले होते.
1998 मध्ये स्वामींनी Belur Math- बेलूर मठ स्थापन केले. यांनी भारतीय जीवनाला एक वेगळी कलाटणी दिली.
याशिवाय स्वामीजींनी अन्य दोन मठाची स्थापना देखील केली.
स्वामी विवेकानंद यांची दुसरी विदेश यात्रा
स्वामी विवेकानंद हे त्यांच्या दुसऱ्या विदेश यात्रेसाठी 20 जून 1899 मध्ये अमेरिकेला गेले. या यात्रेत त्यांनी कॅलिफोर्निया मध्ये शांती आश्रम सॅनफ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क मध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली.
जुलै 1900 मध्ये स्वामीजी हे पॅरिस ला गेले आणि तिथे 'काँग्रेस ऑफ द हिस्ट्री रिलीजन्स' मध्ये सहभागी झाले. जवळपास 3 महिने पॅरिस मध्ये त्यांचे शिष्य बहीण निवेदिता व स्वामी तरियानंद देखील सोबत होते.
त्यानंतर 1900 च्या शेवटच्या काळात भारतात ते परत आले. 1901 मध्ये त्यांनी बोधगया आणि वाराणसी ही तीर्थयात्रा देखील केली. या काळात त्यांचे स्वास्थ्य खराब होत होते. अस्थमा आणि डायबेटीस सारख्या आजारांनी त्यांना ग्रासले होते.
स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू - Swami Vivekananda Death
4 जुलै 1902 रोजी केवळ 39 वर्ष वय असताना स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शिष्यांच्या मते त्यांनी महा समाधी घेतली होती. त्यांनी केलेली भविष्यवाणी होती की ते 40 वर्षापेक्षा जास्त जगणार नाहीत आणि ते खरे झाले. या महान पुरुषाचा अंतिम संस्कार हा गंगा नदीच्या तटावर झाला.
स्वामी विवेकानंद यांचे विचार - Swami Vivekananda Quotes
अत्यंत प्रभावशाली आणि बुद्धिमान असे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी सर्व लोक प्रभावित होते. स्वामीजींच्या विचारांमध्ये कायम राष्ट्रीयता असायची. त्यांनी कायम देशातील लोकांच्या विकासासाठी काम केले. त्यांचे अनमोल विचार स्वतःच्या जीवनात आचरण करून कोणीही जीवनात यशस्वी होऊ शकतो.
स्वामी विवेकानंद यांचे म्हणणे होते की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात एक विचार किंवा एक संकल्प ठेऊन आपले संपूर्ण जीवन ते संकल्प पूर्ण करण्यावर व्यतीत करायचे आहे, तेव्हाच तुम्हाला यश मिळेल.
मानवता आणि राष्ट्रासाठी स्वामी विवेकानंद यांचे योगदान
विलक्षण प्रतिभा असनारे स्वामी विवेकानंद यांनी प्रत्येकाच्या जीवनात आपला प्रभाव टाकला आणि त्यांनी सर्व युवा पिढीत आत्मविश्वास निर्माण केला. याने युवा पिढीला फक्त मार्गदर्शन मिळाले असे नाही तर त्यांचे आयुष्य देखील बदलले.
स्वामी विवेकानंद यांचे योगदान-
संपूर्ण जगात संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार
स्वामी विवेकानंद यांनी आपल्या ज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या जोरावर लोकांच्या मनात धर्माविषयी नवीन आणि विस्तृत माहिती दिली.
विवेकानंद हे बंधुता आणि एकता यांना महत्व देत होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक मनुष्याला एक नवीन आणि विस्तृत असा दृष्टिकोन ठेवायला शिकवले.
महापुरुष विवेकानंद यांनी शिक्षण आणि आचरणाचे नवीन सिद्धांत बनवले.
विवेकानंद यांनी पूर्व आणि पश्चिम देश हे एकमेकांसोबत जोडण्यात महत्वाचे योगदान दिले.
भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजून सांगण्यात महत्वाची भूमिका
स्वामी विवेकानंद यांनी स्वतःच्या साहित्याच्या माध्यमातून भारताच्या संस्कृतीला आणि साहित्याला एक वेगळी उंची निर्माण करून दिली.
स्वामी विवेकानंद यांनी लोकांना सांस्कृतिक भावनेतून जोडण्याचा प्रयत्न केला.
विवेकानंद हे त्यांच्या पायी यात्रेत जातीयवादाला बघून खूप दुःखी झाले होते. ही गोष्ट संपवण्यासाठी त्यांनी खालच्या जातीचे महत्व लोकांना सांगितले आणि त्यांना समाजात मुख्य धारेसोबत जोडण्याचा प्रयत्न केला.
विवेकानंद यांनी भारतातील धार्मिक साहित्याचा योग्य अर्थ समजून सांगण्यात महत्वाचे योगदान दिले.
हिंदुत्वाच्या महानतेचे वर्णन
जगाच्या समोर विवेकानंद यांनी हिंदुत्वाचे महत्त्व समजावून सांगण्यात मोलाची भूमिका बजावली.
प्राचीन धार्मिक परंपरावर त्यांनी नवीन विचार जोडले.
स्वामी विवेकानंद जयंती - Swami Vivekananda Jayanti
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन - National Youth Day म्हणून साजरा केला जातो. विवेकानंद हे असे महान पुरुष होते की त्यांचा प्रभाव हा प्रत्येकावर खोलवर रुजला होता.
स्वामी विवेकानंद यांच्या विषयी महत्वपूर्ण तथ्य - Facts About Swami Vivekananda
बी ए डिग्री मिळवल्यानंतर देखील स्वामी विवेकानंद यांना नोकरीच्या शोधात भटकावे लागले होते. पुढे यश न मिळाल्याने ते नास्तिक बनले.
स्वामी विवेकानंद हे त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या विषयी कायम संशयित वृत्ती ठेवत असत आणि त्यांना प्रश्न विचारत असत. ते त्यांच्या गुरुची पाठ त्यांच्या शंकेचे निरसन होत नाही तोपर्यंत सोडत नसे.
खेत्री येथील महाराजा अजित सिंग हे स्वामी विवेकानंद यांच्या आईला गुप्ततेत आर्थिक मदत म्हणून 100 रुपये पाठवत, यातून त्यांच्या परिवाराची आर्थिक मदत होत असे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा संपूर्ण जगात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
त्यांच्या आईवर ते खूप प्रेम करत असत आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी आईची सेवा केली.
वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरात खूप दारिद्र्य आले, त्यामुळे स्वामी विवेकानंद अनेक वेळा घरी खोटं बोलत असे की त्यांना बाहेर जेवणासाठी आमंत्रण आले आहे.
स्वामी विवेकानंद यांची बहीण जोगेंद्रबाला यांनी आत्महत्या करून जीवन संपवले होते.
विश्व धर्म संमेलन शिकागो येथे विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'मेरे अमेरिकी भाईयो और बहनो' याने करत सर्वांची मने जिंकली होती.
स्वामी विवेकानंद यांचे जीवन इतके साधे होते की त्यांनी 1996 मध्ये लंडन येथे कचोरी सुद्धा बनवली होती.
पक्षी आणि प्राण्यांवर स्वामी विवेकानंद यांचे प्रेम होते, त्यांनी गाय, माकड, शेळी आणि मोर यांचे पालन केलेले होते.
विवेकानंद यांना चहा आवडत असे.
स्वामी विवेकानंदांना खिचडी खायला आवडत असे.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील रहस्य - Life and Philosophy of Swami Vivekananda or Swami Vivekananda Teachings
परोपकार
समाजाला जर एका नव्या उंचीवर न्यायचे असेल तर परोपकारी भावना असली पाहिजे आणि त्यामुळे यात सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे स्वामी विवेकानंद म्हणत. ते सांगत की , देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप जास्त मोठा आहे.
कर्तव्यनिष्ठा
स्वामी विवेकानंद यांचे म्हणणे होते की जे काही करायचे आहे ते संपूर्ण इच्छाशक्तीने करा अन्यथा करू नका. ते स्वतः देखील जे काही काम करायचे ते संपूर्ण कर्तव्यनिष्ठेने करायचे आणि आपले पूर्ण लक्ष त्याच कामामध्ये लावत असत, कदाचित याच गुणामुळे ते महान पुरुष बनले.
ध्येय निश्चित करणे
स्वामी विवेकानंद यांचे म्हणणे होते की यश मिळवण्यासाठी ध्येयाचे असणे आवश्यक आहे, कारण या निश्चित केलेल्या लक्षामुळेच आपले ध्येय प्राप्तीकडील पाऊल योग्य दिशेने पडते.
साधे जीवन
स्वामी विवेकानंद हे साध्य जीवनशैलीवर विश्वास ठेवून होते. ते भोवतालच्या नास्तिक साधनांवर दुर्लक्ष करत असत. त्यांचे म्हणणे होते की नास्तिक विचार आणि आनंद या गोष्टी मनुष्याला लालची बनवत असतात.
भीतीचा हिंमतीने सामना करा
स्वामी विवेकानंद यांचे विचार होते की भीती पासून दूर पळण्यापेक्षा त्याचा सामना करायला हवा. कारण जर मनुष्य हा हिंमत हारून मागे हटत असेल तर त्याला नक्कीच अयशस्वी व्हावे लागेल. तर जो मनुष्य त्या भीतीचा उभा राहून सामना करत असेल तर भीती देखील त्याला घाबरून निघून जाईल.
थोडक्यात स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती - Swami Vivekananda Jivan Charitra
कॉलेजचे शिक्षण घेत असताना ते ब्राह्मो समाजा कडे आकर्षित झाले होते. ब्राह्मो समाजाच्या संपर्कात येऊन ते मूर्तिपूजा आणि नास्तिकवाद यांच्या विरोधात होते. पुढे 1882 मध्ये त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि या घटनेने विवेकानंद यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी दिली. योग साधनेच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते, असा विश्वास रामकृष्ण परमहंस यांचा होता. त्यांच्या या विचाराने विवेकानंद यांच्यावर खूप प्रभाव टाकला व ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य बनले.
1886 मध्ये रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले.
1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात धर्म विश्व परिषद होती. या परिषदेत सहभागी होत स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माची बाजू प्रखरपणे मांडली. त्यांच्या भाषणाची सुरुवात एका मुख्य वाक्यने झाली आणि यातून त्यांनी हिंदू धर्माची श्रेष्ठता आणि महानता दाखवून दिली.
स्वामी विवेकानंद यांचे प्रभावी व्यक्तिमत्व आणि बुद्धिमत्ते मुळे अमेरिकेत देखील त्यांना खूप लोक पसंत करायला लागले. त्यांना पसंत करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांनी जागो जागी त्यांची व्याख्याने घेतली. विवेकानंद 2 वर्ष अमेरिकेत राहिले. या काळात त्यांनी हिंदू धर्मातील विश्व बंधुतेचा संदेश तेथील लोकांमध्ये पसरवला. त्यानंतर स्वामी इंग्लंडला गेले, तिथे मार्गारेट नोबेल त्यांच्या शिष्य बनल्या. पुढे याच भगिनी निवेदिता नावाने प्रसिद्ध झाल्या.
1897 मध्ये त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यासोबत जगात अनेक ठिकाणी रामकृष्ण मिशनच्या शाखा स्थापन केल्या. जगातील सर्व धर्म खरे आहेत आणि ते एकाच ध्येयाकडे जाणारे अनेक मार्ग आहेत, ही रामकृष्ण मिशनची शिकवण होती.
रामकृष्ण मिशन ने धर्मसोबत समाजात सुधारणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याशिवाय मिशनच्या मार्फत जागोजागी अनाथाश्रम, हॉस्पिटल, वसतिगृह बांधले गेले.
अंधश्रद्धा, कर्मकांड आणि आत्यंतिक ग्रंथ यांच्यावर पाणी सोडून आता सद्विवेक बुद्धीने धर्माचा अभ्यास करा. मनुष्याची सेवा हाच खरा धर्म आहे अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांनी जाती व्यवस्थेवर हल्ला चढवला. त्यांनी मानवतावाद आणि विश्वबंधुतेचा प्रसार केला. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचे महत्त्व त्यांनी जगाला पटवून दिले.
स्वामी विवेकानंद फक्त एक संत नव्हते तर ते एक महान तत्त्वज्ञानी, एक महान देशभक्त, विचारक आणि साहित्यिक देखील होते.
Frequently Asked Questions about Swami Vivekananda
प्रश्न: स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर: नरेंद्र विश्वनाथ दत्त
प्रश्न: विवेकानंद यांचा जन्म कधी आणि कुठे झाला होता?
उत्तर: 12 जानेवारी 1863 ला स्वामी विवेकानंद यांचा जन्म हा पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथे झाला होता.
प्रश्न: राष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो?
उत्तर: स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजे 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंद हे युवकांचे प्रेरणास्थान होते. स्वामी विवेकानंद यांना युवकांकडून खूप जास्त अपेक्षा होती, त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा युवा दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
प्रश्न: स्वामी विवेकानंद यांचे गुरू कोण होते?
उत्तर: रामकृष्ण परमहंस
प्रश्न: विश्व धर्म संमेलनात भाग घेण्यासाठी स्वामी विवेकानंद कुठे गेले होते?
उत्तर: शिकागो (संयुक्त राष्ट्र अमेरिका)
प्रश्न: रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद
प्रश्न: स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू कधी आणि कसा झाला? (How did swami vivekananda die)
उत्तर: 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला. त्यांचे शिष्य सांगतात की त्यांनी महा समाधी घेतली.
प्रश्न: विवेकानंद यांना समर्पित कोणते स्मारक कन्याकुमारी येथे आहे?
उत्तर: विवेकानंद रॉक मेमोरियल
प्रश्न: स्वामी विवेकानंद यांनी कोणते साहित्य / पुस्तके लिहिली?
उत्तर: राज योग, कर्म योग, भक्ती योग, मेरे गुरू, अल्मोडा पासून ते कोलंबो पर्यंत दिलेली व्याख्याने
प्रश्न: बेलूर मठ ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद