चित्तरंजन दास यांचे जीवन चरित्र - Chittaranjan Das Biography in Marathi
Chittaranjan Das - चित्तरंजन दास हे देशबंधु नावाने प्रसिद्ध होते. ते भारतीय राजनेता होते आणि ब्रिटिश शासन असताना त्यांनी बंगाल मध्ये स्वराज्य पार्टी स्थापन केली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा दिला.
पुरा नाव- चित्तरंजन भुवनमोहन दास
जन्म- 5 नोव्हेंबर 1870
जन्मस्थळ - कोलकत्ता
वडील - भुवन मोहन
आई - निस्तारिणी देवी
शिक्षा - इ.स. 1890 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज कोलकाता येथून बी.ए. , इ.स. 1892 मध्ये लंडनहून बॅरिस्टर पदवी मिळवली.
विवाह - बसंती देवी यांच्या सोबत 1897 मध्ये
चित्तरंजन दास यांचा संबंध हा ढाका (सध्या बांगलादेश मध्ये) असलेल्या बिक्रमपुर येथील बैद्य ब्राह्मण दास परिवाराशी आहे. ते भुवन मोहन दास यांचे पुत्र तर ब्रह्म समाज सुधारक दुर्गा मोहन दास यांचे भाचे होते. त्यांच्या भावंडात सतीश रंजन दास, सुधी रंजन दास, सरला रॉय आणि लेडी अबला बोस या आहेत. त्यांचा सर्वात मोठा पुतण्या सिद्धार्थ शंकर राय आणि पुतणीचे नाव हे मंजुला बोस होते.
इंग्लंड मध्ये चित्तरंजन दास यांनी शिक्षण पूर्ण करत बॅरिस्टर बनले. त्यांचे सामाजिक कार्य हे 1909 मध्ये सुरू झाले जेव्हा त्यांनी मागील वर्षी अलीपुर बाँब केस मध्ये अरविंद घोष हे समाविष्ट नव्हते असे म्हणत त्यांचे रक्षण केले होते. नंतर अरविंद घोष यांनी त्यांच्या भाषणात चित्तरंजन दास यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचे रक्षण केले म्हणून आभार देखील मानले होते.
बंगाल मध्ये 1919-1922 दरम्यान झालेल्या असहकार आंदोलनात मुख्य नेत्यांपैकी चित्तरंजन दास एक होते. त्यांनी इंग्रजांच्या कपड्याचा देखील खूप विरोध केला होता. त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी स्वतःचे युरोपियन कपडे जाळून खादीचे कपडे घालायला सुरुवात केली. एका वेळी त्यांचे कपडे पॅरिस मध्ये शिवले आणि धुतले जायचे आणि स्वतःचे कपडे कोलकात्याला पाठवण्यासाठी त्यांनी एक लौंड्रि देखील सुरू केली होती. नंतर जेव्हा दास हे स्वतंत्रता चळवळीत सहभागी झाले तेव्हा त्यांनी या सर्व सुख सुविधांचा त्याग केला.
त्यांनी फॉरवर्ड वृत्तपत्राची सुरुवाट देखील केली आणि पुढे जाऊन त्याचेच नाव हे लिबर्टी टू फाईट दि ब्रिटिश राज ठेवले. जेव्हा कोलकाता म्युनिसिपल कॉर्पोरेशन ची स्थापना झाली तेव्हा दास हेच पहिले महापौर बनले. त्यांचा अहिंसा आणि न्यायालयीन कायद्यांवर पूर्णपणे विश्वास होता. त्यांना विश्वास होता की याच जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकते आणि हिंदू मुस्लिम समाजात एकता देखील आपण प्रस्थपित करू शकतो. त्यांनी पुढे जाऊन 1923 मध्ये मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांच्या सोबत मिळून स्वराज्य पार्टीची स्थापना देखील केली. यांच्या माध्यमातून ते विचार लोकांपर्यंत पोहोचवत होते.
त्यांचे विचार आणि महानता हे त्यांचे शिष्य पुढे घेऊन गेले. सुभाषचंद्र बोस हे त्यांच्या विचारांवर चालत होते.
त्यांच्या देशप्रेमी विचारांकडे बघता त्यांना देशबंधु ही पदवी दिलेली होती. ते भारतीय समाजाशी जोडलेले होते आणि कविता देखील लिहीत होते. त्यांनी त्यांच्या असंख्य लेखांनी आणि निबंधांनी लोकांना प्रेरित केले. त्यांनी बसंती देवी (1880-1974) यांच्याशी विवाह केला. त्यांना तीन अपत्य होते, अपर्णा देवी (1898-1972), चिरंजन दास (1899-1928) आणि कल्याणी देवी (1902-1983) हे त्यांचे नाव होते.
चित्तरंजन दास यांच्या सोबत बसंती देवी यांनी देखील स्वतंत्रता अभियानात सहभाग घेतला. त्यांच्या वहिनी उर्मिला देवी या असहकार आंदोलनात 1921 मध्ये कोर्ट अरेस्ट होणाऱ्या पहिल्या महिला होत्या. सर्वांच्या प्रति जोश आणि आकर्षण यांच्या जोरावर बसंती देवी या स्वतंत्रता अभियानाच्या महत्वाचा चेहरा बनला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना आई म्हणून हाक मारत असत.
1925 मध्ये कायम काम करत राहिल्याने चित्तरंजन दास यांच्या तब्येतीत बिघाड होत होते. त्यामुळे ते या सर्व गोष्टींपासून दूर झाले आणि त्यांनी दार्जिलिंग मधील पर्वतांमध्ये असणाऱ्या घरात राहायला सुरुवात केली. इथे महात्मा गांधी देखील त्यांना भेटायला येत असत. 16 जून 1925 मध्ये जास्त तापाच्या मुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे देह हे ट्रेनच्या सहाय्याने कोलकत्ता येथे आणण्यात आले व त्यावर त्याकाळातील विशेष पद्धतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोलकाता येथे गांधीजींनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले होते आणि तिथे गांधीजी म्हणाले होते की,
" देशबंधु देशातील महान देशप्रेमी पैकी एक होते… त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न बघितले होते… आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते बोलत असत आणि याशिवाय त्यांच्या आयुष्यात काही नव्हते… त्यांचे हृदय देखील हिंदू आणि मुस्लिम यात भेदभाव करत नव्हते. यात ते गोऱ्या लोकांना देखील समान स्थान देत होते. ते कोणताही भेदभाव करत नसत."
हजारो च्या संख्येत लोक त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते. कोलकत्ता येथील कोराताला स्मशानभूमीत त्यांना अग्नी दिला गेला. अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी झालेल्या हजारो लोकांची संख्या बघून आपण अंदाज लावू शकतो की किती जास्त लोक त्यांचा सन्मान आणि आदर करत होते. इतकेच नव्हे तर लोकांनी त्यांना " बंगाल का बेताज बादशहा" ही पदवी दिली होती. त्यांच्या मृत्यूनंतर विश्वकवी रवींद्रनाथ ठाकूर त्यांच्या प्रति प्रखर शोक आणि आदरांजली म्हणून लिहिले होते की,
"एनेछिले साथे करे मृत्यूहीन प्रान।
मरने ताहाय तुमि करे गेले दान।।"
देशबंधु या उपाधीने संबोधले जाणारे चित्तरंजन दास हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व होते. चित्तरंजन दास हे स्वभावाने इमानदार आणि विनम्र होते. आपल्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्यांनी त्याग केला होता. ते यथार्थवादी नेते होते. देशाच्या विषयी त्यांचे अतूट प्रेम यामुळेच त्यांना देशबंधु म्हणून संबोधले जाते. ते त्यांच्या सिद्धांतांशी एकनिष्ठ होते, खरे देशभक्त आणि मानवतावादी धर्माचे पुरस्कर्ते आणि पालनकर्ते होते. संपूर्ण भारत देश त्यांचे योगदान कायम लक्षात ठेवील.
थोडक्यात चित्तरंजन दास यांचे जीवन - Short Information About Chittaranjan Das
इंग्लंड पार्लमेंट मध्ये चित्तरंजन दास यांनी भारताचे प्रतिनिधी दादाभाई नौरोजी यांचा प्रचार करून दादाभाई यांचे मन जिंकून घेतले होते.
1894 मध्ये चित्तरंजन दास हे कोलकत्ता उच्च न्यायालयात वकील बनले.
1905 मध्ये चित्तरंजन दास यांनी स्वदेशी मंडळाची स्थापना केली.
1909 मध्ये अलीपुर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांच्या वतीने त्यांनी न्यायालयात लढा दिला. आणि घोष यात निर्दोष देखील सुटले.
1914 मध्ये त्यांनी नारायण नावाने एक बंगाली मासिक देखील सुरू केले.
1917 मध्ये बंगाल प्रांताच्या राजकीय परिषदेत ते अध्यक्ष होते.
1921 ते 1922 या काळात अहमदाबाद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिले.
चित्तरंजन दास यांनी मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांच्यात समवेत स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
फॉरवर्ड दैनिकात ते लिहीत होते आणि प्रकाशन देखील करत होते.
1924 मध्ये कोलकाता महापालिकेचे ते अध्यक्ष देखील झाले.
विशेषता: स्वतःची संपूर्ण संपत्ती त्यांनी मेडिकल कॉलेज आणि स्त्रियांच्या हॉस्पिटल साठी दान केली. त्यांची ही विशेषता त्यांना देशबंधु नावाचे हक्कदार बनवते.
मृत्यू : 16 जून 1925 रोजी त्यांचा मृत्यू झाला.