राजेंद्र कुमार पचौरी जीवन चरित्र - Rajendra K Pachauri Biography in Marathi
पूर्ण नाव (Name) : डॉ. राजेंद्र कुमार पचौरी
जन्म (Birthday) : 20 ऑगस्ट 1940 , नैनिताल (उत्तराखंड)
शिक्षण (Education) : परदेशात शिकवण्याचा अनुभव - इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग आणि अर्थशास्त्रात पीएच डी
विवाह (Wife Name) : सरोज पचौरी
मृत्यू (Death) : 13 फेब्रुवारी 2020 (दिल्ली)
जेव्हा 2007 मध्ये नोबेल शांती पुरस्कारांची घोषणा झाली तेव्हा भारतीयांना आनंद होणे साहजिक होते. 9 वर्षांच्या पूर्वी अर्थशास्त्राचे नोबेल हे अमर्त्य सेन यांना मिळाले होते आणि आता भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले आणि चर्चेत असलेले पर्यावरणतज्ञ डॉ. राजेंद्र कुमार पचौरी / Rajendra K Pachauri यांना अमेरिकी उपराष्ट्रपती अल्बर्ट ओरनाल्ड (अल) गोर गुनियर यांच्या सोबत संयुक्तपणे 2007 सालचा नोबेल शांती पुरस्कार प्राप्त झाला.
इथे सांगण्यासारखी गोष्ट ही आहे की जिथे अल गोर यांना हा पुरस्कार पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या केलेल्या वयक्तिक कार्यासाठी देण्यात आलेला होता तर डॉ राजेंद्र कुमार पचौरी यांना हा पुरस्कार व्यक्तिगत स्वरूपात मिळाला नव्हता. अल गोर यांच्या समवेत हा पुरस्कार इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) नावाच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNO) संस्थेला मिळाला होता.
डॉ. पचौरी हे या संस्थेचे अध्यक्ष होते. परंतु याने त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे महत्व कमी होत नाही. युद्धात मोर्चावर फौजेतील शिपाई लढतात परंतु जिंकण्याचे श्रेय हे रचना करणाऱ्या सेनापतीलच मिळते. असेच डॉ. पचौरी यांच्या विषयी म्हणले जाऊ शकते.
डॉ राजेंद्र कुमार पचौरी / Rajendra K Pachauri यांनी डिजल लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसी येथून आपल्या करियरला सुरुवात केली. इथे त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम करत कार्य करत गेले. पचौरी भारतात आले तेव्हा त्यांचा अनुभव देखील त्यांच्या सोबत होता. भारतात येऊन पचौरी एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज, हैद्राबाद येथे सिनियर फॅकल्टी मेम्बर म्हणून रुजू झाले.
1975 ते 1979 पर्यंत ते इथेच कार्यरत होते. इथे उल्लेख करायला हवा की हैद्राबाद येथील या एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज मध्ये देशातील आय ए एस ना प्रशिक्षित केले जाते. 1979 ते 1981 पर्यंत ते कंसलटिंग अँड अपलाईड रिसर्च डिव्हिजन मध्ये डायरेक्टर म्हणून राहिले.
त्यानंतर 1981 मध्ये पचौरी यांनी टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (TERI) याचा कार्यभार संचालक / डायरेक्टर म्हणून सांभाळला. ऊर्जा, पर्यावरण, वन, बायोटेक्निक आणि नैसर्गिक साधन संपत्ती क्षेत्रात TERI ला खुप महत्व आहे. 2001 मध्ये पचौरी या संस्थेच्या मुख्य स्थानी म्हणजेच डायरेक्टर जनरल पदावर आले.
याच वर्षी भारत सरकारने पचौरी यांच्या कार्याचा पद्मविभूषण देऊन सन्मान केला. 1988 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण कार्यक्रम आणि विश्व जलवायू संघटनेची (IPCC) स्थापना केली. पचौरी यांनी 20 एप्रिल 2002 रोजी या संस्थेच्या चेअरमन पदाची सूत्रे सांभाळली.
या व्यतिरिक्त पचौरी यांच्या इतर अनेक महत्वाची कार्ये आहेत- वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी मधील मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस कॉलेज मध्ये रिसोर्स इकॉनॉमिक्स विभागात ते व्हिजिटिंग प्रोफेसर होते. रिसोर्स सिस्टम इन्स्टिट्यूट, ईस्ट वेस्ट सेन्टर, अमेरिका येथे देखील व्हिजिटिंग फेलो होते. विश्व बँकेत, वॉशिंग्टन येथे देखील ते व्हिजिटिंग रिसर्च फेलो होते. पचौरी 1994 ते 1999 पर्यंत या कार्यात जोडून होते. 2000 मध्ये पचौरी येल युनिव्हर्सिटी, अमेरिका मधील स्कुल ऑफ इन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट स्टडीज सोबत ते फेलो म्हणून जोडले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर पचौरी हे इंटरनेशनल सोलर एनर्जी सोसायटी (ISES) आणि वर्ल्ड रिसोर्सिंग इन्स्टिट्यूट ऑन डेव्हलपिंग कंट्रीज सोबत मेम्बर म्हणून जोडले गेले.
इंटरनेशनल असोसिएशन फॉर एनर्जी इकॉनॉमिक्स(IAEE) ,वॉशिंग्टन डी सी मध्ये पहिले पचौरी यांनी प्रेसिडेंट आणि नंतर चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारला. ते 1992 पासून एशियन एनर्जी इन्स्टिट्यूट चे प्रेसिडेंट देखील होते. भारत सरकारच्या अनेक समित्यांमध्ये देखील पचौरी सहभागी होते. ऊर्जा क्षेत्रात दक्षता ठेवणाऱ्या पॅनेलमध्ये पचौरी सहभागी होते.
हे पॅनल ऊर्जा मंत्रालयाने बनवले होते. याशिवाय दिल्ली व्हिजन - कोर प्लॅनिंग ग्रुप, भारत सरकारच्या एडवाईजरी बोर्ड ऑफ एनर्जी, नॅशनल इन्व्हायरमेंटल कौन्सिल आणि ऑइल इंडस्ट्री रिस्ट्रक्चरिंग ग्रुपचे देखील पचौरी हे मेम्बर राहिलेले आहेत.
ट्राइरिम साइंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च फाउंडेशन च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर मध्ये देखील त्यांचा समावेश होता. इंडिया इंटरनेशनल सेंटरच्या एक्सिक्युटिव्ह कमिटी मध्ये 1985 पासून सदस्य आहेत. 1987 पासून इंडिया हैबीटेट सेंटर मधील गव्हर्निंग कौन्सिलचे मेम्बर असून एडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज मधील कोर्ट ऑफ गव्हर्नर्स चे देखील ते सदस्य आहेत.
1999 मध्ये पचौरी यांना दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हेरिटेज फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. 2001 मध्ये त्यांना प्रधानमंत्री यांच्या नंतर इकॉनॉमिक एडव्हाईजरी कौन्सिल चे सदस्यत्व दिले. 10 डिसेंबर 2007 रोजी नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला तेव्हा त्यांची विनम्रता बघण्यासारखी गोष्ट होती.
परंतू आम्ही जागरूक वाचकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की वातावरणातील बदलांनी अनेक समस्या समोर येत आहेत, या सर्व मानव प्रजातीला प्रभावित करत आहेत. पचौरी यांनी IPCC साठी नोबेल पुरस्कार घेताना सांगितले होते की -
" या पुरस्काराच्या मिळण्याने वातावरणातील बदलाच्या ज्वलंत समस्येकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाईल"
आमचे देखील हेच म्हणणे आहे की ही समस्या मानवनिर्मित आहे आणि याच्या उपाययोजना आपल्याला शोधून अंमलात आणणे गरजेचे आहे.
नोट- आपल्याकडे About Rajendra K Pachauri in Marathi किंवा information असेल किंवा दिलेल्या माहितीत काही चूक असेल तर आम्हाला कमेंट मध्ये किंवा मेल वर कळवा, आम्ही ती अपडेट नक्की करू!