कोविड वॅक्सिन रजिस्ट्रेशन : 18 वर्षांवरील व्यक्ती असा करा स्लॉट बुक, कसे करावे

कोविड वॅक्सिन रजिस्ट्रेशन : 18 वर्षांवरील व्यक्ती असा करा स्लॉट बुक, कसे करावे

कोव्हिड वॅक्सिन साठी रजिस्ट्रेशन कसे करावे, कुठे रजिस्टर करायचे, डाउनलोड सर्टिफिकेट, सेंटर, साईड इफेक्ट्स, कागदपत्र [Covid Vaccine Registration] (How to Register, Apps, Online, for 18+, India, Cowin, Arogya Setu, Umang App, Required Documents, in Marathi) 

Covid Vaccine Registration Process in Marathi

आत्ताच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घोषणा केली आहे की आता भारतात 18 वर्षे पूर्ण असलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाईल. 18 वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरणाची सुविधा ही लवकरच सुरू केली जाणार आहे. या लेखात तुम्हाला
लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन ची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. आपण हा लेख पूर्ण वाचाल तर नक्की पूर्ण माहिती वाचा. 

लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे 

तुमचे वय जर 18 पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही देखील कोरोना ची लस घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. कोरोना लस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी तुम्ही घरी बसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या जवळील लसीकरण केंद्रावर जाऊन देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.  

वॅक्सिन रजिस्ट्रेशन साठी आवश्यक कागदपत्रे (Documents) 

जेव्हा तुम्ही कोरोना लसीकरणासाठी रजिस्टर करणार असाल तेव्हा आपल्याला खालील गोष्टींची गरज आहे. 

  • आधार कार्ड: जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा आपल्याला फक्त आधारकार्ड मागितले जाते. याचे 2 कारण आहेत, पहिले म्हणजे आधार च्या सहाय्याने तुमचा data verify करण्यात मदत होते. दुसरे म्हणजे आधार कार्ड वर तुमची संपूर्ण माहिती आहे, आपल्याला याविषयी जास्त काही माहिती समजून सांगण्याची काही गरज नसावी. 

  • मोबाईल नंबर: कोरोना लसीकरण साठी आवश्यक गोष्टींमध्ये मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे. त्याया मोबाईल नंबर वर तुम्हाला लसीकरणासाठी संपर्क केला जातो किंवा कॉल देखील केला जातो. 

कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया (Registration Process) 

आपण कोरोना लसीकरण विषयी जाणून घेतले आहे तर आणखी एक भर म्हणजे महाराष्ट्र शासन या लस पूर्णपणे मोफत देखील देणार आहे. आता यासाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेऊयात. 

Cowin च्या मदतीने रजिस्ट्रेशन 

कोरोना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचे असेल तर सर्वात सोपा पर्याय क्रमांक एक हा Cowin आहे. Cowin च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकता. खाली Cowin Website च्या मदतीने रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सविस्तरपणे सांगतो आहे. 

  • Step 1- या वेबसाईटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला Cowin Website ला भेट द्यायची आहे. 

  • Step 2 - या पेज वर आल्यावर आपल्याला "Register/Sign In yourself" असे ऑप्शन दिसेल. इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस विषयी माहिती मिळेल. 

  • Step 3 - इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर ची मागणी केली जाईल.  

  • Step 4 - दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल तो तुम्हाला वेबसाईटवर देऊन verify करायचा आहे. 

  • Step 5 - नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तो तुमच्या नावाशी रजिस्टर होतो. पुढील माहिती मध्ये तुम्हाला आधार नंबर द्यावा लागतो. त्यासोबत आपले नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव इत्यादी माहिती भरून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

  • Step 6 - आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नावे देखील तिथे ऍड करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्यांचे आधार नंबर हे नावासोबत जोडावे लागतात. 

  • Step 7 - ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. आपल्याला लसीकरणाच्या दिवशी कॉल करून बोलावून घेतले जाईल. 

Arogya Setu App च्या मदतीने रजिस्ट्रेशन 

जर तुम्हाला Cowin Website वरून रजिस्ट्रेशन जमत नसेल तर तुमच्या मोबाईलवर असलेल्या Arogya Setu App च्या मदतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. खाली दिलेली प्रोसेस फॉलो करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 

  • Step 1 - सर्वात आधी तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की तुमच्या मोबाईल मध्ये Arogya Setu App आहे की नाही? जर नसेल तर Google Play Store वरून किंवा Apple Store वरून install करू शकता. 

  • Step 2 - पुढच्या प्रक्रियेत तुम्ही या app च्या होम पेजवर येता तेव्हा "Vaccination" नावाचे एक हिरव्या रंगाचे बटन बघायला मिळेल, त्यावर आपल्याला जायचे आहे. 

  • Step 3 - या Vaccination page वर आल्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन साठी मोबाईल नंबर विचारला जाईल. 

  • Step 4 - हाच नंबर तुम्हाला OTP च्या सहाय्याने व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर पुढील पायरीवर तुम्हाला आधार नंबर रजिस्टर करायचा आहे. 

  • Step 5 - आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या कुटुंबातील इतर सदस्य देखील यात जोडू शकता. 

  • Step 6 - ही प्रक्रिया पूर्ण झाली की आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झालेली असेल. 

Umang App च्या मदतीने रजिस्ट्रेशन 

Umang app च्या मदतीने देखील आपण घरबसल्या सहज रजिस्ट्रेशन करू शकतो. 

  • Step 1 - सर्वात आधी आपल्याला हे app आपल्या मोबाईल मध्ये install करायचे आहे, आपण हे app आपल्या मोबाईलवर install केले की आपण याच्या मदतीने सहज रजिस्ट्रेशन करू शकता. 

  • Step 2 - हे app इंस्टॉल केल्यानंतर यावर लॉगिन करा. 

  • Step 3 - लॉगिन केल्यानंतर तुम्ही त्यांच्या home page वर येता आणि आपल्याला यात खूप features आणि सेवा दिसतात. 

  • Step 4 - यावर आपल्याला health हे ऑप्शन दिसेल, जसे तुम्ही यावर क्लिक करता तेव्हा तुम्हाला Cowin हे नाव दिसेल. या ऑपशन वर तुम्हाला जावे लागते. 

  • Step 5 - जसे तुम्ही यावर क्लिक करता तसे तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, यातील "Register For Vaccine" यावर क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही यावर क्लिक कराल तुम्हाला Cowin च्या अधिकृत वेबसाईटवर Redirect केले जाईल. इथे तुम्ही सहज Registration करू शकता. 

  • Step 6 - या सहज आणि सोप्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 

Vaccination साठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन 

जर लसीकरणासाठी तुम्हाला ऑफलाईन रजिस्ट्रेशन करायचे असेल तर आपल्या जवळील लसीकरण केंद्राला आपल्याला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन तुम्ही आधारकार्ड च्या मदतीने रजिस्ट्रेशन करू शकता. 

लसीकरणासाठी कधी जावे 

तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लसीकरणासाठी जवळील लसीकरण केंद्र एक तारीख सांगेल. त्या दिवशी आपल्याला तिथे जाऊन लस घ्यायची आहे. 

लसीकरणाच्या नंतर प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे 

लसीकरणानंतर आपण अगदी सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेली सरळ आणि सोपी पद्धत फॉलो करायची आहे.  

  • Step 1 - सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये umang app डाउनलोड करायचे आहे. 

  • Step 2 - इथे home page वर आपल्याला health नावाचे ऑप्शन मिळेल. 

  • Step 3 - इथे तुम्हाला Download Certificate हे ऑपशन दिसेल. याच्या मदतीने आपण सहज प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. 

या लेखाच्या माध्यमातून कोविड लसीकरणासाठी असलेली रजिस्ट्रेशन प्रोसेस सांगितली आहे. आशा आहे तुम्हाला माहिती समजली असेल. 


FAQ 

प्रश्न : लस ही स्वदेशी आहे का? 

उत्तर : हो, आपल्याला मिळणारी प्रत्येक लस ही भारतात निर्मित झालेली आहे. 

प्रश्न : लस मोफत मिळेल का? 

उत्तर : हो, महाराष्ट्र सरकार आता फ्री देणार आहे. सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत मिळते आहे. 

प्रश्न : लस सुरक्षित आहे का? 

उत्तर : हो, लस पूर्णपणे सुरक्षित आहे. 

प्रश्न : कोविड लसीचे प्रमाणपत्र आपण डाउनलोड करू शकतो का? 

उत्तर : हो, उमंग ऍप च्या मदतीने आपण डाउनलोड करू शकतो. 

प्रश्न : लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन मोफत आहे का? 

उत्तर : हो, लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने