पारशी धर्म नामशेष होतोय - Parasi Ancient Religion
सध्या भारतात फारशी समुदायाची एकूण लोकसंख्या साठ हजारांपेक्षा कमी झाली आहे. आपला धर्म कसा टिकवायचा यासाठी हा समुदाय झगडतोय. हजारो वर्षांपूर्वी धार्मिक छळ टाळण्यासाठी तेव्हाच्या पर्शियातून पारशी समुदायांना पलायन केलं होतं तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी भारतात पाऊल ठेवलं होतं.
तसंच इतर धर्मातल्या लोकांचं पारशी धर्मात कधीच धर्मांतरण करणार नाही असं त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं. पण त्यानंतर भारतातल्या पारशी समुदायाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. उलट त्यांची संख्या वेगाने कमी झाली. आता साठ हजारांपेक्षा कमी पारशी लोक अस्तित्वात आहेत. 1940 च्या दशकात हीच संख्या एक लाखाहून जास्त होती.
मग हा प्राचीन धर्म वाचवण्यासाठी पारशी लोक काय करतायेत? काहींच्या मते पारशी समुदायाचा एक लग्न करणं हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. पण एवढ्या कमी लोकांमध्ये योग्य साथीदार मिळणे अवघड झाले आहे. तेव्हा झारीन हावेवाला यांनी एक काम सुरू केलं. गेली दहा वर्षे त्या पारशी समुदायात तरुणांची लग्न जुळवून देण्याचे काम मोफत करता येत.
पंचवीस वर्षांचा कैझाद सध्या लग्नासाठी जरीन यांची मदत घेतोय, तो घरातला एकुलता एक वारस आहे.
आठ वर्षात पूर्वी भारत सरकार जियो पारशी नावाची योजना सुरू केली, त्याद्वारा फर्टिलिटी ट्रीटमेंट गर्भधारणेसाठी च्या उपचाराचा सगळा खर्च सरकार उचलते. दरम्यान नियमानुसार पारशी मुलींने धर्माबाहेर लग्न केलं तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही .
पण लग्नाचे नियम शिथिल केले तर पारशी धर्माच्या मुख्य धारेपासून लोक दूर जातील असं नाही पारशी लोकांना वाटतं. असे मतभेद असले तरी भारतातल्या सगळ्या पारशी लोकांनी त्यांचा धर्म वाढवण्यास प्राथमिकता द्यायचे ठरवले.