गाय गरीब झाली - गजानन महाराजांची कथा || Gay Garib Jhali -Marathi Katha
बाळापूर गावात सुखलाल नावाचा एक व्यक्ती रहात होता. सुखलालच्या घरी एक द्वाड गाय होती. ती गाय गावात जाऊन कोणालाही शिंगे मारायची. कोणत्याही दुकानात जाऊन तिथले धान्य किंवा फळे तर खायचीच मात्र याशिवाय तिथे नासधूस देखील करायची.
गावातील सर्व लोक तिच्या द्वाडपणामुळे त्रस्त झाले होते. सुखलाल देखील तिला कंटाळला होता.
एके दिवशी एक गावकरी सुखलालला म्हणाला "अहो सुखालाल, या गाईने हैराण केले आहे." यावर दुसरा गावकरी म्हणाला की " तुम्ही काहीही करा पण या गाईला घालवा एकदाचे!"
सुखलाल म्हणाला, "अहो, एका खाटकाला देखील देऊन पाहिले. पण या गाईने त्या खाटकालाचा शिंगाने मारले."
गाईमुळे त्रस्त झालेल्या सुखलालला गावकऱ्यांनी गाईला शेगाव ला नेण्यास सांगितले.
यासाठी गावकऱ्यांनी त्या गाईला साखळदंडाने बांधून गाडीत बसवले. गाय वाटेने जाताना खूप हिसळे मारून त्रास देत होती.
जस जसे शेगाव जवळ येऊ लागले तशी गाय हळूहळू शांत होऊ लागली. गाईला शेगावात आणले गेले. गजानन महाराजांच्या समोर गाईला आणताच गाय गरीब झाली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
गाईला बघून महाराज म्हणले की "या गाईला बांधण्याचा मूर्खपणा का केला? गाय तर सगळ्या जगाची माय असते!"
इतके होऊन सुद्धा कोणीच गाई जवळ गेले नाही. मग महाराजांनी गाईला सोडविले. महाराजांनी तिला सोडताच गाईने महाराजांना 3 वेळा प्रदक्षिणा घातली. त्यानंतर गाईने महाराजांचे पाय चाटायला सुरुवात केली.
महाराज गाईला म्हणाले, "तू इथेच राहा. आणि आता कोणाला त्रास देऊ नकोस."
तेव्हापासून ती गाय शांत झाली आणि शेगावातच राहू लागली.
गजानन महाराज की जय!