अप्पर वैतरणा धरण/ अळवंडी धरण - Upper Vaitarna Dam/ Alwandi Dam information in Marathi

अप्पर वैतरणा धरण/ अळवंडी धरण - Upper Vaitarna Dam/ Alwandi Dam information in Marathi

धरणाचे नाव- अप्पर वैतरणा धरण/ अळवंडी धरण (Upper Vaitarna Dam/ Alwandi Dam)

नदीचे नाव- वैतरणा नदी

ठिकाण- इगतपुरी

जिल्हा- नाशिक

अप्पर वैतरणा धरण/ अळवंडी धरण - Upper Vaitarna Dam/ Alwandi Dam information in Marathi

Alwandi Dharan / Upper Vaitarna Dharan Marathi Mahiti

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या तालुक्याच्या ठिकाणी हे धरण आहे. वैतरणा या नदीवर या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1973 साली अप्पर वैतरणा या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीमध्ये अप्पर वैतरणा या धरणाचा 21 वा क्रमांक लागतो. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हे धरण असल्यामुळे याला अप्पर वैतरणा असे म्हणले जाते. वैतरणा नदीवर अजून 2 धरणे देखील आहेत. यात मिडल वैतरणा आणि मोडकसागर म्हणजे लोवर वैतरणा यांचा समावेश होतो. 

अप्पर वैतरणा धरणाची उंची 41 मीटर म्हणजे 135 फूट आहे. धरणाची लांबी 2531 मीटर म्हणजे 8304 फूट आहे. अळवंडी म्हणजेच अप्पर वैतरणा धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 11.71 टीएमसी म्हणजे 11710 दशलक्ष घनफुट इतकी आहे. अप्पर वैतरणा धरणाला 5 दरवाजे आहेत. मुंबई ला पाणी पुरवठा करण्यासाठी या धरणाचा वापर होतो. 

मुंबई आणि नाशिक येथील पर्यटक या धरण परिसराला नक्की भेट देतात. इथला निसर्ग हा खूप सुंदर आहे. 

अप्पर वैतरणा / अळवंडी धरणाला कसे पोहोचाल?

इगतपुरी या शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर अप्पर वैतरणा हे धरण आहे. नाशिक शहरापासून 64 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. मुंबई शहरापासून 153 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने