उजनी धरण | Ujani Dam Information in Marathi

उजनी धरण | Ujani Dam Information in Marathi

धरणाचे नाव- उजनी धरण (Ujani Dam)
नदीचे नाव- भीमा नदी
ठिकाण- विमानगर
जिल्हा- सोलापूर
उजनी धरण | Ujani Dam Information in Marathi

Ujani Dharan Marathi Mahiti
सोलापूर जिल्ह्यात विमानगर या गावामध्ये  हे धरण आहे. 1969 साली या धरणाचे काम सुरू झाले आणि बांधकाम हे 1980 मध्ये पूर्ण झाले. महाराष्ट्रातील हे एक प्रमुख धरण आहे. कोयना आणि जायकवाडी या धरणांनंतर या धरणाचा तिसरा क्रमांक लागतो. 
उजनी धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजे फूट तर लांबी 2534 मीटर म्हणजे फूट आहे. उजनी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 110 टीएमसी म्हणजे 110000 दशलक्ष घनफुट असून त्यातील 50.85 टीएमसी म्हणजे 50850 दशलक्ष घनफुट हा जिवंत साठा आहे. या धरणाला मिळणारे पाणी हे पुण्यातील मुळा आणि मुठा सारख्या या अनेक नद्यांमधून येते. 
इकडे मत्स्यपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर (Yashwant Sagar) असे म्हणतात. तुम्हाला फ्लेमिंगो या परदेशी पक्षाचे निरीक्षण करायचे असेल तर हा पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. या धरणाचा फुगवटा हा खूप मोठा आहे. जवळपास दौंड पर्यंत हा पसरलेला आहे. या उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याच्या आत तुम्हाला पळसनाथ हे मंदिर जेवहा पाणीसाठा कमी होईल तेव्हा बघायला मिळेल. 

उजनी धरणाला कसे पोहोचाल?

बारामती या शहरापासून हे धरण 45 किलोमीटर अंतरावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने