जायकवाडी धरण || Jayakwadi Dam Information In Marathi
धरणाचे नाव- जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)
नदीचे नाव- गोदावरी नदी
ठिकाण- पैठण
जिल्हा- औरंगाबाद
Jayakwadi Dharan Marathi Mahiti
महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात पैठण या गावाजवळ असलेल्या जायकवाडी धरणाविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील पाणीसाठ्याचा बाबतीत हे धरण दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. गोदावरी या नदीवर हे धरण बांधलेले आहे. धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 दरम्यान पूर्ण झाले.
धरणाची उंची 41.3 मीटर म्हणजे 135 फूट तर लांबी 9998 मीटर म्हणजे 32802 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 102 टीएमसी म्हणजे 102000 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाच्या पाण्यावर जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत.
मातीचा भराव व दगडी बांधकाम यांचा वापर करून हे धरण बांधण्यात आले आहे. धरणावरून एकूण दोन कालवे जातात. डावा कालवा 208 किलोमीटर तर उजवा कालवा 132 किलोमीटर आहे. धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणले जाते. धरणावर असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पातून 12 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.