Netflix वरच्या 10 Must Watch वेबसिरीज || Top Must Watch Series On Netflix
आज आपण नेटफ्लिक्स या व्हिडीओ प्लॅटफॉर्म वर असलेल्या अशा काही 10 वेबसिरीज बघणार आहोत ज्या तुम्ही एकदा नक्कीच बघायला हव्यात.
मनी हाईस्ट
हा एक स्पॅनिश शो होता जो नेटफ्लिक्स ने विकत घेतला. त्यानंतर या शो ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या सिरीज मधील सर्वांचे लाल रंगाचे कपडे आणि विशिष्ट प्रकारचे मास्क हे लोकांची सिरीज विषयी असलेली उत्सुकता आणखी वाढवतात. सिरीज विषयी सांगायचे झाले तर ही सिरीज म्हणजे चोर आणि पोलीस हा खेळच आहे. सिरीज मध्ये तुम्ही बघाल की चोर हे पोलिसांच्या दोन पाऊले कायम पुढे असतात आणि हे सर्व पोलीस या चोरांचा पाठलाग काय सोडत नाहीत.
ब्रेकिंग बॅड
या सिरीज विषयी तुम्ही कुठेही सर्च केले तर तुम्हाला हे नाव top 5 webseries या यादीत नक्कीच सापडते. ब्रेकिंग बॅड मधल्या 5 व्या सिजनचा 14 वा एपिसोड हा जगातील सर्वात हाय रेटेड एपिसोड आहे. ब्रेकिंग बॅड या सिरीजची स्टोरी अगदी साधी आहे. एका केमिस्ट्री शिकवणाऱ्या शिक्षकाला त्याला कॅन्सर झाल्याचे कळते. आपली वेळ आली आहे म्हणून आता हा माणूस परिवाराला पैसे साठवून ठेवायचे म्हणून ड्रग डिलिंग करायला लागतो. हीच स्टोरी लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की ती आज जगातील सर्वात जास्त रेटिंग असलेली सिरीज बनली आहे.
फ्रेंड्स
असा एक टीव्ही शो आहे जो 25 वर्षांपासून सुरू आहे परंतु आजही त्याची लोकप्रियता तितकीच जास्त आहे. 1994 सालची गोष्ट आहे , मार्था क्रोफमन आणि डेव्हिड क्रेन नावाचे दोन मित्र आपल्या कॉलेजच्या आठवणी काढत असताना त्यांना या शो ची आयडिया सुचली. ही गोष्ट आहे अमेरिकेत राहणाऱ्या 6 मित्रांची! या सिरीजचा महत्वाचा उद्देश म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या मित्रांमध्ये होणाऱ्या गमतीजमती लोकांना दाखवून लोकांना भरपूर हसवायचे.
शेरलॉक
ही एक ब्रिटिश क्राईम टेलिव्हिजन सिरीज आहे. यात अनेक रहस्य घडतात आणि मग शेरलॉक येऊन त्याच्या हुशारीने सर्वांना अचंबित करून टाकतो.
हाऊस ऑफ कार्डस
हाऊस ऑफ कार्ड्स म्हणजे अमेरिकन पॉलिटिकल ड्रामा! ही सिरीज बो बिलीमन यांनी तयार केलेली आहे. 1990 साली झालेल्या बीबीसी च्या त्याच नावाच्या मालिकेचे हे रूपांतर आहे. या सिरीज मधल्या हिरोला एक राजकीय पद हवे असते पण ते काही त्याला मिळत नाही. मग राजकारणातील डावपेच खेळून तो कसं ते मिळवतो त्याची ही गोष्ट!
बिग बँग थेरी
सिरीज मध्ये सर्व सायंटिस्ट असल्याने सर्व लोक हे विक्षिप्त डोक्याचे आहेत. त्यांचा विक्षिप्त पणा बघून अनुपम पोट धरून नक्की हसतो.
पिकी ब्लाइंडर्स
गँगस्टर ड्रामा मध्ये काहीतरी वेगळे बघायचे असेल तर ही सिरीज नक्कीच बघा. या सिरीज मध्ये दाखवली गेलेली स्टोरी ही खरी जरी नसली तरी देखील ही स्टोरी ज्या एका गॅंग भोवती फिरते ती गॅंग इंग्लंड मध्ये खरच अस्तित्वात होती.
ब्रूक्लिन 9-9
हा देखील एक कॉमेडी टेलिव्हिजन शो होता जो 17 सप्टेंबर 2013 साली Fox वर प्रीमियर करण्यात आला. या वेबसिरीज मध्ये आहे एक पोलीस स्टेशन, तिथे घडणाऱ्या गोष्टी, किस्से आणि घटना या सिरीजमध्ये कॉमेडी स्वरूपात दाखविण्यात आलेल्या आहेत.
स्ट्रेंजर थिंग्स
15 जुलै 2016 साली नेटफ्लिक्स वर या सिरीजचा प्रीमियर झाला. ही गोष्ट म्हणजे शांत असलेल्या हॉकिंग शहराची कथा आहे. जिथे कधीच कुठला गुन्हा घडलेला नसतो परंतु नंतर काय घडते हे तुम्ही सिरीज मध्ये बघाल!
सुट्स
ही गोष्ट आहे एका सुटा-बुटात असलेल्या वकिलाची! एक लॉ फर्म जी फक्त हुशार वकिलांना नोकरी देत असते. तिथे वकिलीची डिग्री न घेतलेला कॉलेज ड्रॉप आउट व्यक्ती येऊन मुलाखत देतो. तो त्याच्या हुशारीच्या जोरावर पास देखील होतो. हा सर्व काही खेळ असतो त्याच्याकडे असलेल्या फोटोग्राफिक मेमरीचा!
या होत्या नेटफ्लिक्स वरच्या 10 must watch वेबसिरीज. एकदा या सिरीज नक्की बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.