भातसा धरण | Bhatsa Dam Information In Marathi

भातसा धरण | Bhatsa Dam Information In Marathi

धरणाचे नाव- भातसा धरण (Bhatsa Dam)

नदीचे नाव- भातसा व चोरणा नदी संगम

ठिकाण- साजवली, शहापूर

जिल्हा- ठाणे

भातसा धरण | Bhatsa Dam Information In Marathi

Bhatsa Dharan Marathi Mahiti

शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ हे धरण आहे. मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्वाचे धरण आहे. भातसा हा प्रकल्प मोठा प्रकल्प आहे. भातसा आणि चोरणा या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील भातसा हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच धरण आहे.महाराष्ट्रातील दगडी बांधणीतील धरणांमध्ये भातसा हे धरण सर्वात उंच आहे. भातसा धरणाचे बांधकाम 1969 ला सुरू झाले. या प्रकल्पाचा खर्च पुढे वाढतच गेला आणि 2000 साली धरणाचे बांधकाम अखेर पूर्ण झाले.

भातसा धरणाची उंची 88.5 मीटर म्हणजे 290 फूट तर लांबी 949 मीटर म्हणजे 3146 फूट आहे. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 34.47 टीएमसी म्हणजे 34470 दशलक्ष घनफुट इतकी आहे. मुंबई शहरासाठी लागणारे जवळपास 50% पाणी हे भातसा धरणातून पुरविले जाते. भातसा धरणातून जाणाऱ्या दोन कालव्यांमधून देखील पाणीपुरवठा केला जातो. 15 मेगावॅट वीजनिर्मिती या धरणाच्या पाण्यातून केली जाते.

भातसा धरणाला कसे पोहोचाल?

शहापूर गावापासून हे धरण 20 किलोमीटर अंतरावर आहे. ठाणे शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने