स्नेहा दुबे (IFS) मराठी बायोग्राफी || Sneha Dubey (IFS) Marathi Biography
काही दिवसांपासून ट्विटर वर एक नाव ट्रेंडिंग ला आले ते म्हणजे स्नेहा दुबे! पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये भारताला घेरायचं हे ध्येय होते. त्यांनी भारताविरुद्ध अनेक गोष्टी बाहेर टाकल्या परंतु भारताकडून संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पहिल्या सचिव म्हणजेच फर्स्ट सेक्रेटरी स्नेहा दुबे यांनी त्यांना चांगलेच प्रतिउत्तर दिले.
स्नेहा दुबे यांनी सर्वांच्या समोर पाकिस्तान कशा प्रकारे खोटे बोलतो आहे हे सांगितले. ओसामा बिन लादेन सारख्या दहशतवाद्याला थारा देणाऱ्या आणि काश्मीर वर बेकायदा कब्जा करणाऱ्या पाकिस्तानने आधी स्वतःकडे बघावं असे खडे बोल स्नेहा यांनी सुनावले. काश्मिर वर पाकिस्तान ने बेकायदा कब्जा केला आहे आणि तिथून त्यांनी काढता पाय घ्यावा, दहशतवादाला पाकिस्तान एकप्रकारे प्रेरणा देतोय या सर्व गोष्टी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडणाऱ्या या स्नेहा दुबे आहेत तरी कोण? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. आज आपण स्नेहा दुबे यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. (Sneha Dubey Information in Marathi, Shena Dubey Biography marathi, sneha dubey marathi mahiti)
Sneha Dubey Marathi Biography / Wiki
संपूर्ण नाव (Full Name)- स्नेहा दुबे
टोपण नाव (Nickname) - स्नेहा
वडिलांचे नाव (Fathers Name)-
आईचे नाव (Mothers Name)-
भावाचे नाव (Brothers Name)-
शिक्षण (Education) - Mphil (New Delhi JNU)
UPSC बॅच - 2011
सध्याचे पद / सेवा - IFS
स्नेहा दुबे यांचे बालपण - Childhood of Sneha Dubey Marathi
स्नेहा दुबे यांचे बालपण हे गोव्यात गेले. सुरुवातीपासूनच त्यांचे ध्येय हे भारतीय परराष्ट्रीय सेवेत जाणे हे होते. त्या IFS अधिकारी असून देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्यांचे ध्येय होते. हे ध्येय त्यांनी वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच निश्चित केले होते.
स्नेहा दुबे कौटुंबिक माहिती - Family details of Sneha Dubey
स्नेहा यांचे वडील हे एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात. त्यांची आई शिक्षिका आहे. स्नेहा यांचा भाऊ हा एक उद्योजक आहे.
स्नेहा दुबे शिक्षण - Educational Background of Sneha Dubey
स्नेहा यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या JNU म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून भूगोल या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये विशेष रस असणाऱ्या स्नेहा यांनी JNU मधून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज मध्ये Mphil देखील केले.
स्नेहा दुबे प्रशासकीय सेवा - Sneha Dubey in Public Service
2011 साली त्यांनी पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या कुटुंबातील आधी कोणीही सदस्य हा प्रशासकीय सेवेत नव्हता. परंतु स्नेहा यांनी प्रसाशकीय सोडून दुसरा एकही पर्याय ठेवलेला नव्हता आणि त्यामुळे स्नेहा यांनी शिक्षणासोबतच प्रशासकीय सेवेचा अभ्यास सुरू केला होता.
त्यांची निवड ही IFS मध्ये झाली. त्यांना सुरुवातीला बाह्य व्यवहार मंत्रालयात टाकण्यात आले. पुढे जाऊन 2014 साली स्नेहा यांची नियुक्ती ही माद्रिद येथील भारतीय दुतावासात झाली.
पाकिस्तान ला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत खडे बोल सूनवणाऱ्या स्नेहा यांचे सध्या सर्वत्र कौतुक होते आहे.