ICAR AIEEA परीक्षा संपूर्ण माहिती || ICAR AIEEA Exam information in Marathi
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हणले जाते परंतु वेळेनुसार या क्षेत्रात जी आधुनिकता येत गेली आहे त्यानुसार सुशिक्षित आणि सक्षम अशा स्किल असलेल्या संशोधकांची गरज देखील भासत आहे. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आता शेती क्षेत्रात इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. विद्यार्थ्याने हे कोर्स केल्यास शेती क्षेत्रात संशोधन करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. यात तुम्हाला शासकीय नोकऱ्या तर आहेच परंतु खाजगी क्षेत्रात देखील अशा कुशल लोकांची गरज असते.
त्यामुळे जर तुम्ही शेती क्षेत्रात रुची ठेवत असाल आणि शेती क्षेत्रात करियर करायचा विचार देखील करत असाल तर तुम्ही ICAR या परिक्षेविषयी माहिती घेतलीच पाहिजे. आम्ही या लेखात तुमच्यासमोर ICAR या परिक्षेविषयी सर्व माहिती देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला परिपूर्ण माहिती हवी असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा.
ICAR म्हणजे काय?
ICAR चा फुल फॉर्म हा Indian Council of Agricultural Research आहे. ही एक उच्च अशी स्वायत्त संस्था आहे जी भारतात शेती आणि त्याच्याशी निगडित विज्ञान क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाला चालवते. ही संस्था शिक्षण आणि संशोधन क्षेत्राची जाहिरात करते आणि त्यासोबतच त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण देखील ठेवते.
ICAR कडे शेती क्षेत्राविषयी एक मोठे जाळे आहे ज्यात केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांमधून B. Tech, Bsc , M.tech आणि PhD करू शकतो.
ICAR ची परीक्षा तुम्ही पास करून तुम्ही शेती क्षेत्रात शिक्षण घेऊ शकता. यात करियरच्या संधी देखील भरपूर आहेत.
ICAR ची AIEEA Exam
ICAR AIEEA Exam म्हणजे ICAR All India Entrance Examination होय. ही परीक्षा शेतीशी निगडित पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरल प्रोग्रॅम मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते.
AIEEA ही परीक्षा 3 विभागांत घेतली जाते.
PCM म्हणजे Physics, Chemistry and Mathematics
PCB म्हणजे Physics, Chemistry and Biology
PCA म्हणजे Physics, Chemistry and Agriculture
ही परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. NTA म्हणजे National Testing Agency ही परीक्षा घेत असते.
AIEEA परीक्षा ही ऑनलाइन होत असून यात MCQ विचारलेले असतात. यात विषयानुसार तुम्हाला Physics, Chemistry, Biology, Agriculture, Mathematics चे प्रश्न विचारले जातात.
परीक्षेचा कालावधी हा पदवी साठी 2 तास 30 मिनिटे तर पदव्युत्तर आणि PhD साठी 2 तास असतो.
राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा असून सूचनांची भाषा आणि पेपर हा इंग्लिश किंवा हिंदी भाषेत असतो. इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
ICAR AIEEA UG Exam
यात एकूण 150 प्रश्न विचारले जातात. एकूण 600 गुणांची ही परीक्षा असते.
PCM मध्ये Physics चे 50, Chemistry चे 50 आणि Mathematics चे 50 प्रश्न असतात. प्रत्येक विषयाला 200 मार्क असतात. म्हणजे 4 विभागाचे मिळून एकूण 600 मार्क्स असतात. इथे प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांना असतो आणि एका चुकीच्या उत्तराचा 1 मार्क कमी केला जातो.
ICAR AIEEA PG Exam
ही परीक्षा इंग्लिश माध्यमातून असते. यात एकूण 120 प्रश्न असतात. म्हणजे एकूण 480 गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेत देखील 4 गुणांना एक प्रश्न असतो आणि एका चुकीच्या प्रश्नाने 1 गुण कमी होत असतो.
ICAR AIEEA साठी पात्रता- Criteria for ICAR AIEEA Exam
या परीक्षेसाठी तो विद्यार्थी हा भारतीय नागरिक असायला हवा. उमेदवाराचे वय हे कमीत कमी 16 वर्ष असायला हवे. उमेदवार हा कोणत्याही नावाजलेल्या विद्यापीठातून 10+2 झालेला असावा. यात आधी इंग्लिश मिडीयम ची अट होती परंतु आता ती कमी करण्यात आलेली असून हिंदी माध्यम देखील पात्र धरले जाते.
12 वि मध्ये शिकत असताना Physics, Chemistry आणि Mathematics किंवा biology पैकी एक विषय असणे गरजेचे असते. 12 वि मध्ये त्याला 50% मार्क्स मिळालेले हवे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी यात काही सूट देखील दिलेली आहे.
इथे आम्ही तुम्हाला UG प्रोग्रॅम सोबत जोडलेल्या काही कोर्सेस विषयी देखील माहिती देतो आहोत. ICAR AIEEA UG परीक्षेत त्या उमेदवारांच्या गुणांच्या अनुसार त्याला पदवी अभ्यासक्रमात ऍडमिशन मिळते. ही परीक्षा दोन विभागांत आहे.
स्ट्रीम अ: Agriculture and Biology
या स्ट्रीम मध्ये agriculture, horticulture, sericulture, fisheries, forestries, food science, home science आणि biotechnology यांचा समावेश होतो.
स्ट्रीम ब: Mathematics
ही स्ट्रीम mathematics मध्ये असून यात Agricultural Engineering, Dairy Technology, Agricultural Marketing and Cooperation, Food Science, Forestry आणि biotechnology समावेश होतो.
ICAR AIEEA PG परीक्षेत पास झाल्यानंतर Plant Biotechnology, Plant Sciences, Physical Sciences, Entomology and Nematology, Agronomy, Social Sciences, Statistical Sciences, Dairy Sciences, Dairy Technology, Food Science and Technology, Horticulture, Home Science, Forestry, Agriculture Engineering and Technology, Animal Science, Animal Biotechnology, Water science and technology , Veternary Science आणि fisheries Science मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी तुम्हाला ऍडमिशन घेता येते.
ICAR इन्स्टिट्यूट आणि कॉलेज
भारतातील जास्तीत जास्त शेती विषयक अभ्यासक्रम देणारे कृषी विद्यापीठ हे ICAR AIEEA परीक्षेला मान्यता देते.
UG Colleges
State Agricultural Universities (SAU)
Central Agricultural Universities (CAU)
ICAR- Indian Agricultural Research Institute (IARI), New Delhi
Indian Veterinary Research Institute (IVRI), UP
National Dairy Research Institute (NDRI), Haryana
Central Institute of Fisheries Education (CIFE), Maharashtra
Dr Rajendra Prasad Central Agricultural University (RPCAU), Bihar
Aligarh Muslim University (AMU), UP
ICAR AIEEA Exam Application Form
तुम्हाला हा फॉर्म ऑनलाइन भरावा लागेल. Exam झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट समोर येते आणि त्यानुसार ऑनलाइन कौंसलिंग राउंड होतात. हे राउंड पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन दिले जाते.
ICAR Agriculture पदवी नोकरीच्या संधी
ICAR मधून तुमचे ज्या कॉलेज मध्ये ऍडमिशन झाले असेल त्यातून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सेंट्रल आणि स्टेट गव्हरमेंट जॉब्स साठी पात्र असता. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजे IFS मध्ये ते वेगवेगळ्या पोस्ट वर काम करू शकता.
बँकिंग क्षेत्रात Agriculture Finance आणि त्याच्याशी निगडित तुम्हाला नोकरी मिळू शकते. लॅब्स मध्ये प्रोडक्शन मेथड चांगल्या प्रकारे वाढविण्यासाठी तुम्ही काही प्रयोग करू शकता. Mechanical Engineering ही एक फिल्ड आहे. त्यांच्या साईटवर तुम्ही काम करू शकता. शेती आणि कृषी शी निगडित मशीन डिझाइन, डेव्हलप आणि मेंटेनिंग करण्यावर तुम्ही काम करू शकता. यातून तुम्ही शेती आणि कृषिशी निगडित कामे अधिक सुधारून त्यात बदल घडवू शकता.
कृषी विद्यापीठात किंवा कृषी केंद्रात शेतकऱ्यांसाठी एक आधार आणि मार्गदर्शक म्हणून देखील तुम्ही राहू शकता. कॉर्पोरेट क्षेत्रात रसायन निर्माण करणाऱ्या कंपनी, कृषी उत्पादने विक्री करणाऱ्या कंपनी, खाद्यपदार्थ प्रक्रिया कंपनी आणि कृषी यंत्र निर्मिती कंपनी मध्ये मॉनिटरिंग आणि ऍडमिनिस्ट्रेटीव्ह जॉब्स करू शकता.