कॉम्प्युटर अँप्लिकेशन ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स | What is Advance Diploma in Computer Application? Marathi
सध्याच्या काळात कॉम्प्युटर आणि त्याच्याविषयीच्या कोर्स ला भरपूर मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली आहे. कोरोना काळात मग ते घर असो किंवा ऑफिस आता सर्वदूर आपल्या मूलभूत गरजांमध्ये संगणक समाविष्ट केला गेला आहे. परंतु हे क्षेत्र इतके मोठे आहे की याच्याशी निगडित गरजा या कायमच वाढत आहेत. या अशा काळात कॉम्प्युटर अँप्लिकेशन मध्ये जे कोणी एक्सपर्ट आहेत त्यांना प्रत्येक कंपनी स्वतःशी जोडून घेऊ इच्छित आहे. अशामध्ये जर तुम्ही 12 वि पास झाला असाल आणि एका अशाच शॉर्ट टर्म कॉम्प्युटर कोर्सच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा खास कोर्स घेऊन आलो आहोत. याने तुम्हाला कॉम्प्युटर विषय ज्ञान तर मिळेलच परंतु रोजगाराच्या देखील चांगल्या संधी उपलब्ध होतील.
ADCA (Advanced Diploma in Computer Applications) हा कोर्स तुमच्यासाठी एक चांगला कोर्स ठरू शकतो. जर तुम्हाला कॉम्प्युटर अँप्लिकेशन मध्ये इंटरेस्ट असेल आणि गणितावर तुमची चांगली कमांड असेल तर तुम्ही हा कोर्स खूप सहज पूर्ण करू शकता. इथे तुम्हाला याच ADCA (Advanced Diploma in Computer Applications) कोर्स ची पात्रता, फी, कॉलेज आणि अभ्यासक्रम (Eligibility, Fees, Colleges and Syllabus) यांच्याविषयी माहिती मिळेल. ADCA कोर्स विषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
या कोर्सच्या नावावरून तुम्हाला कळाले असेल की हा कोर्स म्हणजे कॉम्प्युटर अँप्लिकेशन मध्ये एक ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी 1 वर्ष आहे. या कोर्स मधून तुम्हाला कॉम्प्युटरविषयी निगडित तंत्रज्ञान आणि रिसर्च साठी लागणारी माहिती मिळेल. हा कोर्स लेखी आणि प्रात्यक्षिक या दोन्ही प्रकारचे ज्ञान देतो. हा पूर्णपणे जॉब ओरिएंटेड कोर्स असून कॉर्पोरेट क्षेत्रात लागणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर विषयी नॉलेज या कोर्समधून तुम्हाला मिळू शकेल.
कॉम्प्युटर, प्रोग्रामिंग लँग्यूजेस, ऑफिस ऑटोमेशन, ऑपरेटिंग सिस्टम, टॅली, वेब डिझाइन या सर्व क्षेत्रात असणारी गरज लक्षात घेऊन हा कोर्स बनविला गेला आहे. या सर्व क्षेत्रांसाठी एक एक्सपर्ट बनविण्यासाठी हा कोर्स बनवला गेला आहे. हा कोर्स करून विद्यार्थ्यांनी खूप कमी कालावधीत चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त कराव्यात म्हणून हा कोर्स बनवलेला आहे.
ADCA मध्ये काय शिकविले जाते? - Topics Tought in ADCA Course
ADCA कोर्स मध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर हार्डवेअर, बेसीक कॉन्सप्ट ऑफ अकाउंट, वर्क शिट्स, डॉक्स वर्ड, फॉर्म्स डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम, पॉवरपॉइंट स्लाइड्स, बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस, मेंटेनिंग लेजर्स कॅश बुक, फायनान्शियल अकाउंटिंग (टॅली), कम्प्लिट इंटरनेट, फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, व्हायरस प्रोटेक्शन अँड स्कॅनिंग, C Language, C++ Language FoxPro, Frontpage, HTML Javascript या सर्व गोष्टी शिकविल्या जातात.
ADCA कोर्स साठी पात्रता - Eligibility Criteria For ADCA Course
ADCA (Advanced Diploma in Computer Applications) करण्यासाठी तुमचा 12 वि पर्यंत शिक्षण हे झालेले हवे. याच्या पुढे या पात्रतेत काही मुख्य कंडिशन नाहीत. परंतु काही कॉलेज मध्ये तुम्हाला कॉम्प्युटरशी निगडित एखादा कोर्स झालेला लागतो तर काही कॉलेज हे 12 वि पास असलेल्या विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षेच्या आधारावर ऍडमिशन देत असतात. काही कॉलेज हे तुम्हाला लगेच ऍडमिशन देऊ शकतात.
जर 11 वि आणि 12 वि मध्ये असताना तुम्ही कॉम्प्युटर हा विषय मुख्य किंवा ऑप्शनल विषय म्हणून अभ्यासला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल.
ADCA कोर्स अभ्यासक्रम - Syllabus for ADCA Course
हा एक वर्षाचा कोर्स एकूण 2 सत्रात पूर्ण केला जातो परंतु काही कॉलेज हा कोर्स 4 सत्रात पूर्ण करत असतात. प्रत्येक कॉलेजच्या अनुसार तुम्हाला या कोर्स मध्ये बदल बघायला मिळू शकतो. इथे आज आपण 2 सत्रात हा कोर्स काय अभ्यासक्रम पूर्ण करून घेतो याविषयी जाणून घेऊयात.
सत्र 1 अभ्यासक्रम
Microsoft Windows XP/ vista
Microsoft Office 2007
Microsoft PowerPoint
Microsoft Excel
Microsoft Access (Database)
Microsoft Word
Internet and Email
Computer Fundamentals
Computer Network and Multimedia Concept
सत्र 2 अभ्यासक्रम
Tally 5.4
Visual Basics
C programming
C++ programming
CorelDraw
Photoshop CS
यामध्ये वेळेनुसार व्हर्जन हे बदलले गेले आहेत. त्यामुळे 2007 ऑफिस न शिकवता तिथे ऑफिस 365 शिकवले जात आहे.
ADCA कोर्स साठी भारतातील कॉलेज - Top Colleges for ADCA Course
ठाकूर पॉलिटेक्निक, मुंबई
प्रोफेशनल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मुंबई
गुरुकुल पॉलिटेक्निक, चंद्रपूर
भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक, पुणे
आचार्य नरेंद्र देव कॉलेज, दिल्ली
राजेश्वरी आर्टस् अँड सायन्स कॉलेज फॉर वूमन, तामिळनाडू
सरस्वती कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, तामिळनाडू
बिरला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एड्युकेशन (BITE), नवी दिल्ली
डॉ आर एन सत्वने कॉलेज, हरियाणा
मीना शहा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, उत्तर प्रदेश
एस कुला वूमनस कॉलेज, मणिपूर
GIIT, हरियाणा
महर्षी कौटिल्य अकॅडमी (MKA), मध्य प्रदेश
इन्स्टिट्यूट ऑफ करियर डेव्हलपमेंट (ICDL), लखनऊ
दुर्गा कॉलेज, छत्तीसगड
ADCA कोर्सची फी - Fees for ADCA Course
ADCA कोर्स ची फी ही 8 हजार पासून 40 हजार रुपये इतकी कॉलेज नुसार बदलू शकते.
हा कुठल्याही प्रकारे पदवी अभ्यासक्रम नाहीये. त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी याशिवाय पदवी शिक्षण घेतलेले कधीही योग्यच ठरेल. तुम्हाला या क्षेत्रात करियर करायचे असेल तर कॉम्प्युटर पीजी डिप्लोमा हा देखील एक चांगला पर्याय आहे. याशिवाय तुम्ही काही प्रोग्रामिंग लँग्वेज देखील शिकु शकता ज्यामुळे तुमच्या करियरला अधिक फायदा होऊ शकेल.
ADCA केल्यानंतर रोजगाराच्या संधी - job Opportunities After Completing ADCA
ADCA केल्यानंतर काय जॉब च्या संधी आहेत हे जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. आयटी सिक्युरिटी, ईआरपी बेसिक्स, पीसी असेंम्बली आणि ई-बिझनेस सारख्या अनेक क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. तुम्ही जितके जास्त गुण मिळवाल मग ते प्रोग्रामिंग कोर्सेस असो किंवा इतर तुम्ही जे कराल त्यावर तुमच्या नोकरी अवलंबून असतील.
E-commerce, Database Development आणि Programming सारखे जॉब्स प्रोफाइल देखील तुम्हाला मिळू शकतात. यामध्ये तुम्हाला ज्यात रुची आहे त्याकडे तुम्ही जाऊ शकता.
कॉम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस एक्सिक्युटिव्ह, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डीटीपी ऑपरेटर, ग्राफिक डिझायनर, फ्रंट ऑफिस एक्सिक्युटिव्ह, फोटो एडिटर, कस्टमर सपोर्ट एक्सिक्युटिव्ह आणि HTML कोडर यासारख्या रोजगाराच्या संधी तुमच्यासमोर खुल्या होतील. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करू शकता. तुम्ही वेब डेव्हलपर देखील बनू शकता. CA किंवा CS यांच्यासोबत अकाउंट ऑपरेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. याशिवाय आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सुपरवायझर ही नोकरी देखील तुम्हाला मिळू शकते.
ADCA पगार - Salary for ADCA Fresher
तुम्ही जर ADCA फ्रेशर असाल तर तुम्हाला 3.5 लाख वार्षिक पगार मिळू शकतो.
DCA vs ADCA
DCA आणि ADCA या दोन कोर्सेस मध्ये कायम संभ्रम तयार होत असतो. DCA म्हणजे DIPLOMA IN COMPUTER APPLICATIONS आणि ADCA म्हणजे ADVANCE DIPLOMA IN COMPUTER APPLICATION.
DCA हा कॉम्प्युटर अँप्लिकेशन मधील डिप्लोमा कोर्स असून तो तुम्हाला कॉम्प्युटर विषयी अगदी खोलवर जाऊन शिक्षण देतो. तर ऍडव्हान्स कोर्स मध्ये हीच माहिती ऍडव्हान्स लेव्हल वर दिली जाईल. DCA हा 6 महिन्यांचा देखील असतो आणि 12 महिन्यांचा देखील असतो परंतु ADCA 12 महिन्यांचा कोर्स आहे. DCA हा आपण 10 वि नंतर देखील करू शकतो. ADCA साठी आपली 12 वि झालेली असणे गरजेचे आहे.
ADCA कोर्स विषयी जवळपास सर्व माहिती आम्ही आज आपल्याला दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला विचार करायचा आहे की हा कोर्स तुमच्यासाठी कसा आहे.