रायडरगर्ल विशाखा बायोग्राफी ।। RiderGirl Vishakha Biography in Marathi
Vishakha Fulsunge Biography : RiderGirle Vishakha Biography in marathi, Age, Bikes, Income, Birthday, Caste, Family, Father, Mother
महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात ज्या मुलीने सध्या धुमाकूळ घातला आहे ती म्हणजे विशाखा फुलसुंगे एकेए रायडर गर्ल विशाखा! भारतात सर्वात आधी मोटोव्हीलॉगिंग सुरू करणारी महाराष्ट्राची कन्या तुमची विशाखा फ्रॉम आमची मुंबई...
जाणून घेणार याच विशाखा फुलसुंगे म्हणजेच तुमची रायडरगर्ल विशाखा विषयी!
RiderGirl Vishakha Biography - रायडरगर्ल विशाखा विषयी माहिती
संपूर्ण नाव (Real Name)- विशाखा फुलसुंगे (Vishakha Fulsunge)
जन्मतारीख (Birthdate)- 3 नोव्हेंबर 1993
शिक्षण (Education)- BBA आणि MBA
पत्ता (Address)- मुंबई, महाराष्ट्र
विशाखाचे बालपण - Childhood of Vishakha Fulsunge
लहानपणी ज्या कॉलनी मध्ये विशाखा राहायची त्या कॉलनी मध्ये तिचे काही मित्र देखील होते. ती मुलगी असल्याने ते मुलं तिला त्यांच्या टीम मध्ये कधीच घेत नव्हते. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी ती ते जे करतील ते करत गेली. त्यांनी सायकल घेतली त्यानंतर तिने वडिलांना सांगितले की मला सायकल हवी. वडिलांनी देखील तिला मिकी माउस वाली सायकल घेऊन दिली. बाकी सर्व एक साधारण सायकल चालवत होते तर विशाखा चालवत होती मिकी माउस वाली सायकल स्पेशल मुलींसाठी बनलेली. परंतु ती त्यांच्यापासून इतकी वेगळी दिसत होती की तिला ते मुलं त्यांच्या टीम मध्ये देखील घेणार नाहीत असे तिला वाटले. त्यामुळे ती छोटी सायकल तर होतीच पण त्याच्या जोडीला एक हिरो सायरन आणि BMX सायकल घेतली.
या सायकल वर ती इतर मुलांप्रमाणे स्टंट करणे आणि दुसऱ्या मजल्यावर रहात असल्याने वरच्या मजल्यावरून खाली सायकल आणणे आणि तिला घेऊन फिरणे हे सुरूच होते. सायकल चे दिवस आता गेले!
आता तिच्या मित्रांनी ऍक्टिव्हा चालवायला सुरुवात केली होती परंतु विशाखाला अडचण येत होती उंचीची! Tedx ला दिलेल्या मुलाखतीत विशाखा सांगते की शाळेत असताना तिची उंची खूप कमी होती. त्यावेळी तिच्या वडिलांकडे लॅमरेटा होती. तिने वडिलांकडे हट्टच सुरू केला की मला गाडी शिकायचीच म्हणून गाडी देखील शिकली. आता पुढे जाऊन ते मुलं वडिलांच्या गाड्या चालवायला लागले म्हणून आता विशाखा ला देखील पप्पांची बाईक चालवायची होती. स्पर्धेतून बाहेर पडणे हे कधीच डोक्यात नव्हते आणि स्वतःची एक जागा बनवायची हे तिच्या डोक्यात होतेच. कसंबस वडिलांना सांगून ती अखेर बाईक देखील शिकली.
विशाखाची कॉलेज लाईफ आणि पहिली राईड - First Rode of Vishakha and College Days
पुढे जाऊन देखील कॉलेज मध्ये गेल्यावर तिला स्वतःची बाईक हवी होती परंतु त्यासाठी पैसे देखील हवे होते ना? परंतु आता शिक्षणात पैसे दिले असल्याने आता घरी मागू शकत नव्हती त्यामुळे तिने स्वतः पैसे कमवायचे ठरवले. 10 वीच्या सुट्ट्यांमध्ये तिने पैसे मिळवायला सुरुवात केली. मॉल मध्ये प्रमोटर म्हणून तिने काम केले. यात विशाखाने 300 रुपये कमावले. त्यानंतर तिने मॉल मध्ये होस्टेस म्हणून देखील काम बघितले. त्यामध्ये देखील तिने 800 रुपये प्रति दिवस कमावले. त्या मॉल मध्ये एकदा एक इव्हेंट होता परंतु त्या इव्हेंट साठी अँकर आलेला नव्हता. त्यावेळी विशाखाने संधीचा फायदा घेतला आणि विशाखाने तिथे अँकरिंग केले. त्या दिवशी विशाखा घरी 800 रुपये घेऊन जाणार होती पण आज ती 4000 रुपये कमावून घरी घेऊन गेली होती. आणि असेच करत करत विशाखा ने पैसे जमवून एक बाईक घेतली.
आता बाईक घेतली तर पहिली राईड ही थोडी तरी लॉंग असायला हवी असे तिने ठरवले. ती तिच्या आई सोबत लोणावळा मान्सून राईडला गेली. त्यात बाकी सर्व मुले होती आणि विशाखा एकटी मुलगी होती तिच्या आईसोबत! तिची पहिली बाईक ही केटीएम ड्युक 390 होती आणि तिला तिने कशीष हे नाव दिले होते. विशाखाला प्रत्येक गोष्टीला एक नाव देऊन आपलंसं करायला आवडत.
प्रत्येल बाईकर चे जे स्वप्न असते की आता बाईक घेतली आहे तर लडाख जायचेच आहे. लडाख ला जायचे तर मग स्वतः सोबत मित्र देखील हवेत परंतु त्या वेळी बाकी मित्रांना तेव्हाच जॉब लागलेला होता मग आता काय? तर तिने निर्णय घेतला की सोलो जायचं पण जायचं! जाऊन त्या तिथल्या प्रत्येक बोर्ड सोबत फोटो घ्यायचा.
विशाखाने आजपर्यंत लडाख, लेह, स्पिती व्हॅली, केरला ट्रिप केलेल्या आहेत. तिने अनेक अनुभव तिच्या युट्युब चॅनल वर सांगितलेले आहेत. कन्याकुमारी राईड मध्ये तिचा अपघात देखील झाला होता. ती व्हिडीओ तुम्हाला तिच्या वेबसाईटवर बघायला मिळेल. तीन दिवस केरळ मध्ये ऍडमिट राहून तिने मुंबई गाठली. त्यानंतर तिच्या लाईफ मध्ये वळण येईल असे सगळ्यांना वाटत असताना तिने पुन्हा राईडला सुरुवात करून दाखवून दिले की स्वप्न जे असतात ते पूर्ण केल्याशिवाय थांबायचे नसते.
तिने काही दिवसात पुन्हा रामेश्वरम, कन्याकुमारी राईड पूर्ण केली. मुंबईला परत येताना तिचा पुन्हा एकदा अपघात झाला. भारतातील पहिली महिला मोटोव्हीलॉगर म्हणून तिने रेकॉर्ड साठी apply केले आणि तिला तो बहुमान देखील मिळाला. त्यांनतर तिने दुसरा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला तो म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटावर पहिली महिला बाईक घेऊन जाणारी विशाखा बनली.
लवकरच विशाखा ही अंदमान निकोबार टुरिझम ची ब्रँड एम्बेसिडर देखील बनली.
Exploring Maza Maharashtra
विशाखा सध्या संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करते आहे. यामध्ये ती 15 दिवस 15 ठिकाणी तिच्या हिमालयान बाईक वरून राईड करते आहे. हिमालयान ला तिने रुद्रा असे नाव दिलेले आहेच.
विशाखाने केलेली भटकंती तुम्हाला तिच्या चॅनल वर बघायला मिळेलच परंतु त्या राईडचे पूर्ण वर्णन आम्हक थोडक्यात तुमच्यासाठी माहिती रूपाने घेऊन यावे की नको? हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा.
विशाखाशी निगडित स्क्वाड-
RVG हे हॅशटॅग ती तिच्या squad साठी वापरत असून या हॅशटॅग च्या माध्यमातूनच ती आता तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट असते.