Shivrajyabhishek Din 2021 Wishes - शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Greetings, Photo Status
शिवप्रेमींना जून महिना लागला की आस लागते ती रायगडाची, 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या त्या भव्यदिव्य दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळ्याची! या वर्षी देखील कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक दिन देखील आपल्याला घराघरात साजरा करावा लागतो आहे. त्यानिमित्ताने आपण एकमेकांना शिवराज्याभिषेक दिन निमित्त शुभेच्छा संदेश पाठवून समोरच्याचे देखील मनोबल वाढवू शकतो.
2021 साली शिवराज्याभिषेक दिन(Shivrajyabhishek Din) हा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 23 जून रोजी आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या जानेवारी महिन्यातील निर्णयानुसार 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर शिव स्वराज्य दिन (Shiv Swarajya Din) किंवा शिवराज्य दिन (Shivrajya Din) म्हणून साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्रेगरियन कॅलेंडर अनुसार ती तारीख होती 6 जून 1674 आणि मराठी वर्षानुसार तो दिवस होता जेष्ठ शुद्ध त्रयोदशी! अखंड कालखंडापासून हिंदवी राज्यावर आलेले संकट ज्या राजाने परतवून लावले त्या राजाचा आज हा छत्रपती होण्याचा सोहळा! "हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा" या एकाच ध्यासाने जीवन जगलेल्या त्या माझ्या शिवबा राजाचा हा राज्याभिषेक सोहळा होता.
मागील वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे शिवराज्याभिषेक सोहळा आपल्याला त्या श्रीमान रायगडी नतमस्तक होऊन अनुभवता येत नाहीये, त्यामुळे खास दीपस्तंभ आज तुमच्यासाठी घेऊन आला आहे, खास शिवराज्याभिषेक दिन निमित्त साधून मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images, Photo आणि फेसबुक स्टेट्स मराठी.
shivrajyabhishek dinachya hardik shubhechha
Shivrajyabhishek Din 2021 Whatsapp Status Messages : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मराठमोळ्या संदेशांच्या माध्यमातून शिवरायांना करा मानाचा मुजरा!
शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा!
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शिवराज्याभिषेक सोहळा 2021 wishes
झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही... !
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
मराठा राजा माझा
म्हणती सारे माझा माझा
आजही गौरव गीते गाती
ओवाळुनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडस या मातीत घडलं
दगड धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्ण सिंहासन सजलं!
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!!!
शिवराज्य दिनानिमित्त शुभेच्छा संदेश - Shivrajya Din Marathi Wishes 2021
सिंहासनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा
मुजरा तुजला आमचा हे प्रभो शिवाजी राजा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
काळजा काळजात एकच धून
6 जून … 6 जून … 6 जून…
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची तयारी कितीतरी महिने अगोदरच सुरू झालेली होती. या तयारीचे वर्णन तुम्हाला शिवदिनविशेष या गर्वाने मराठी आयोजित उपक्रमात वाचायला मिळेल.
जानेवारी महिन्यातील शिवदिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील शिवदिनविशेष
मार्च महिन्यातील शिवदिनविशेष
एप्रिल महिन्यातील शिवदिनविशेष
मे महिन्यातील शिवदिनविशेष
जून महिन्यातील शिवदिनविशेष
जुलै महिन्यातील शिवदिनविशेष
ऑगस्ट महिन्यातील शिवदिनविशेष
सप्टेंबर महिन्यातील शिवदिनविशेष
ऑक्टोबर महिन्यातील शिवदिनविशेष
नोव्हेंबर महिन्यातील शिवदिनविशेष
डिसेंबर महिन्यातील शिवदिनविशेष